शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर चोरट्यांचा धुमाकूळ, कामशेतमध्ये सहा दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:54 IST

बाजारपेठेतील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सहा दुकानांचे शटर उचकटून चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला. रात्री एका दुकानदाराने या संबंधी दुकानाचे शटर अज्ञात चोरटे तोडत असल्याबाबत फोनवर कामशेत पोलीस ठाण्यात कळवूनही संबंधित ठाणे अंमलदाराने उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन कट केला.

कामशेत : येथील बाजारपेठेतील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सहा दुकानांचे शटर उचकटून चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला. रात्री एका दुकानदाराने या संबंधी दुकानाचे शटर अज्ञात चोरटे तोडत असल्याबाबत फोनवर कामशेत पोलीस ठाण्यात कळवूनही संबंधित ठाणे अंमलदाराने उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन कट केला. या प्रकरणी दुकानदारांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील महत्त्वाच्या पाच ठिकाणी पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्यांपैकी पोलीस ठाणे हद्दीतील कॅमेरा सोडून इतर चार कॅमेरे हे सहा महिन्यांपासून बंद आहेत.कामशेत शहरात शिवजयंती, होळी, रंगपंचमी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील, सार्वजनिक मंडळे, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक आदींची बैठक घेण्यात आली होती. या वेळी साईबाबा चौक वस्तीत चोर येत असल्याची काही जणांनी तक्रार करूनही काहीही कारवाई काही झाली नाही. शहरात वाढणाºया भुरट्या चोºया व दरोडे यांच्या पार्श्वभूमीवर दहा महिन्यांपूर्वी शहरात बाजारपेठेतील व्यापारी व इतरांच्या आर्थिक मदतीने पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या पाच ठिकाणी पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यांपैकी पोलीस ठाणे हद्दीतील कॅमेरा सोडून इतर चार कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १४) रात्री दोन ते तीनच्या सुमारास शहरातील पारस परमार, आनंद हिंगडे, विकास ननावरे, सहदेव केदारी, कांतीलाल भाटी, रामलाल प्रजापती यांच्या दुकानांचे शटर कटावणीच्या साहायाने उचकटून दुकानातील चिल्लर व किरकोळ सामानाची चोरी झाली, तर कमल मेन्सवेअर या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न झाला. सर्व दुकानांतील चिल्लर चोरीला गेली असून दुकानाच्या शटरचे मोठे नुकसान झाल्याने व्यापारी वैतागले आहेत.रात्री चोरी होत आहे या संबंधी पोलीस ठाण्यात फोन करून संपर्क केला असता संबंधित पोलीस कर्मचारी यांच्याकडून बेजबाबदारपणे उत्तरे देण्यात आली. येथील सीसीटीव्ही कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद आहेत. याला जबाबदार कोण आदी प्रश्न व्यापाºयांनी उपस्थित केले आहेत. त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात या संबंधीचे निवेदन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास भटेवरा, करण ओसवाल, रमेश लुणावत, पारस परमार व इतर अनेक व्यापाºयांनी पोलीस ठाण्यात दिले.