कोल्हापूर : पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित समीर गायकवाड याची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक रविवारी पहाटे कोल्हापुरात दाखल झाले. समीरवर प्रश्नांची सरबत्ती करतानाच मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील याच्या ठावठिकाण्याबाबत या पथकाने विचारणा केली. पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये येऊन गायकवाड याला सकाळी ७ वाजता ताब्यात घेऊन पथकाने चौकशी सुरू केली होती. त्यानंतर काही तासांसाठी त्यास बाहेर नेऊनही चौकशी केल्याचे समजते. पथक कोल्हापुरात दाखल झाल्याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती.
एनआयएकडून समीरची चौकशी
By admin | Updated: September 21, 2015 01:45 IST