शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वयंसेवी संस्थांनी स्मारकाचे जतन करावे’

By admin | Updated: December 21, 2015 00:29 IST

शहरात अनेक महापुरुषांच्या मूर्ती, पुतळे आणि स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात आणि नावलौकिकात भर पडते. मात्र, जयंती आणि पुण्यतिथी सोडल्यास वर्षभर या पुतळ्याकडे कोणी लक्ष देत नाही.

 शहरात अनेक महापुरुषांच्या मूर्ती, पुतळे आणि स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात आणि नावलौकिकात भर पडते. मात्र, जयंती आणि पुण्यतिथी सोडल्यास वर्षभर या पुतळ्याकडे कोणी लक्ष देत नाही. या स्मारक आणि पुतळ्याची जबाबदारी शहरातील सामाजिक संस्था आणि संघटनांनी घ्यावी, अशी मागणी शिवराज्य संघटनेचे अध्यक्ष अजय जाधव यांनी महापालिकेकडे केली आहे. मूर्ती, पुतळे आणि स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. शहरातील तसेच, बाहेरील नागरिक या स्मारकांना आवर्जून भेट देतात. मात्र, महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी वगळता इतर दिवशी या स्मारकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. वर्षभर या ठिकाणी लाजिरवाणी परिस्थिती असते. अनेक घटकांनी महापुरुषांची जातीपातींत, प्रांताप्रातांत व पक्ष-संघटनांमध्ये वाटणी करून टाकली आहे. सर्व समाज संघटित करण्याचा त्यांच्या जीवन उद्देशालाच आपण विसरलो असल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. या स्मारकांची जबाबदारी शहरातील सामाजिक संस्था आणि संघटनांनी घ्यावी. स्मारकांची आठवड्यातून एकदा स्वच्छता करावी. सुशोभीकरण करावे. महापुरुषांच्या विचारांचा जागर घडवून आणण्यासाठी चित्र प्रदर्शन, व्याख्याने, दीपोत्सव, पोवाडा, चरित्र कथाकथन, शिववंदना आदी उपक्रम राबवावेत, असे त्यांनी नमूद केले आहे. संघटनेतर्फे संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅलीतील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन नियमितपणे केले जाते. महिन्यातून एकदा मूर्तीची स्वच्छता करून शिववंदना होते. व्याख्याने, दीपोत्सव, पोवाडा, चरित्र कथाकथन, मर्दानी खेळ आदी उपक्रम शहरातील सार्वजनिक मंडळ, संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेतले जातात. याच पद्धतीने स्मारकाची स्वच्छता आणि देखभाल करण्याची जबाबदारी प्रत्येक स्वयंसेवी संघटनांनी घ्यावी. यामुळे पुतळ्यांची विटंबनेवरून दंगली भडकण्याची वेळ येणार नाही. यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)