शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील आठ दिवस शहरासाठी ‘आत्यंतिक कसोटी’चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST

डॉ. संजय ललवाणी : पुण्यातील साथीचा सध्या ''पीक'' प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या पुण्यात दररोज ४ ...

डॉ. संजय ललवाणी : पुण्यातील साथीचा सध्या ''पीक''

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या पुण्यात दररोज ४ हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ८ हजारांचा आकडा ओलांडून पुढे गेली आहे. सध्या पुण्यातील कोरोना संसर्गाचा आलेख सर्वोच्च बिंदूवर असून पुढील आठ दिवसांचा कालावधी शहरासाठी ''आत्यंतिक कसोटी''चा असणार आहे, असे भाकीत भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी केले.

साधारणपणे १८ मार्चनंतर शहरातील लोकसंख्या ४ हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज डॉ. ललवाणी यांनी १२ मार्च रोजी व्यक्त केला होता. तो अंदाज तंतोतंत खरा ठरला. पुणे पहिल्यापासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. पुण्यातील रुग्णवाढीचा वेग खूप जास्त आहे. सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील रविवारपर्यंत रुग्णसंख्या आणखी मोठा पल्ला गाठेल. त्यामुळेच हे आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे भाष्य त्यांनी केले. पुण्यातील आरोग्य व्यवस्था वेगाने काम करत असल्याने आठवड्याभरात प्रसारावर नियंत्रण मिळवता येईल.

ललवाणी म्हणाले, ''सध्या एकूण रुग्णसंख्येपैकी १० टक्के लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे आणि त्यातील १० टक्के लोकांना आयसीयूची गरज भासत आहे. लॉकडाऊन न केल्यास रुग्णसंख्येवर आपले कोणतेच नियंत्रण राहणार नाही. आताच्या मिनी लॉकडाऊनचा ३०-४० टक्के परिणाम दोन आठवड्यांनी पाहायला मिळेल. सुरुवातीच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांकडून प्रसार होत होता. आता कुटुंबे, संपूर्ण सोसायटी ''पॉझिटिव्ह'' होताना दिसत आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनने तो प्रसार कसा थांबवणार, हे पहावे लागेल. पार्शियल लॉकडाऊन साथ दिवसांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही. कारण, लोक पुन्हा आपापल्या गावी परतू लागल्यास अर्थचक्र पुन्हा बिघडेल. त्यामुळे सध्या शासनाने लसीकरणावर भर देणे आणि नागरिकांनी आपणहून लसीकरणासाठी पुढे येणे आवश्यक आहे.''

-----

काय असेल मृत्यूदराची स्थिती?

सध्याची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाने २९५ लोकांचा मृत्यू झाला. पुढील दोन दिवसांत मृत्यूचा आकडा ७००-८०० पर्यंत जाऊ शकतो. पुढील आठवड्यात मृत्यूची संख्या १००० पर्यंत जाऊ शकते. लॉकडाऊनचा परिणाम दोन आठवड्यानी दिसू लागेल आणि मृत्युदर कमी होईल.

१५ एप्रिल ते ३१ मे हा कालावधी भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

-----

12 एप्रिलपर्यंतचा प्रशासकीय अंदाज

– ऑक्सिजन विरहित फक्त 9 बेड्स शिल्लक राहतील

– 3207 ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल

– 462 आयसीयु बेड शिल्लक राहतील

– 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल