शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लोकमतच्या आनंदोत्सवात रंगले वृत्तपत्र विक्रेते

By admin | Updated: March 30, 2017 02:38 IST

गेम्स बाँडच्या तालावर केलेले नृत्य... टॅटूच्या रेषा... व्यंगचित्रातून उमटणारी स्वत:ची छबी...

पुणे : गेम्स बाँडच्या तालावर केलेले नृत्य... टॅटूच्या रेषा... व्यंगचित्रातून उमटणारी स्वत:ची छबी... लहानग्यांसाठी असलेले धम्माल- मस्ती खेळ अशा कौटुंबिक वातावरणात वृत्तपत्र विक्रेत्यांचा वसंतोत्सव रंगला. निमित्त होते लोकमत वार्षिक वर्गणीदार योजनेतील गुणवंत विक्रेत्यांच्या मेळाव्याचे. गणेश कला क्रीडा मंच येथे लोकमत वृत्तपत्र विक्रेत्यांचा हा मेळावा पार पडला. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, सहसचिव राम दहाड, मेपल ग्रुपचे अध्यक्ष सचिन अग्रवाल या वेळी उपस्थित होते. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, वितरण विभागाचे उपाध्यक्ष राजीव अगरवाल, उपमहाव्यवस्थापक अमित राठोड, व्यवस्थापक बाळासाहेब ओवंडकर, नितीन मोहिते यांनी स्वागत केले. बाल अभिनेत्री प्राजक्ता अंकुश परुळेकर हिचा विशेष सत्कार करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेचा संघटनेचे अध्यक्ष पारगे यांचा सत्कार सहायक उपाध्यक्ष (वितरण) राजीव अगरवाल आणि उपमहाव्यवस्थापक (वितरण) अमित राठोड यांनी केला. लोकमतच्या वतीने वार्षिक वर्गणीदार योजना राबविण्यात आली होती. यात पुरुष विक्रेत्यांबरोबरच महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा सहभाग उल्लेखनिय होता. त्यांच्यासाठी आयोजित मेळाव्यात विक्रेते सहकुटूंब सहभागी झाले होते. गेम्स बाँड संदीप पाटील यांच्यासोबत विक्रेत्यांच्या कुटुंबीयांनी धमाल केली. गेम्स बाँडने सादर केलेल्या रूप तेरा मस्ताना... परदे में रेहने दो... एक अजनबी हसीना से... यांसारख्या सदाबहार गाण्यांवर महिलांसह अबालवृद्धांनी ठेका धरला. लहान मुलांनी त्यांच्यासाठी खास सादर केलेल्या ढिपाडी... ढिप्पांग आणि चिंताता...चिता चिता... या गाण्यांवर धमाल उडवून दिली. पुरुष विक्रेत्यांसाठी खास फॅशन शो घेण्यात आला. त्यांनीही उत्साहाने मॉडेलप्रमाणे सादरीकरण केले. छोटा भीमच्या प्रतिकृतीसोबत बालगोपाळ सेल्फी काढताना दिसत होते. टॅटू आणि स्वत:चे व्यंगचित्र (कॅरीकेचर) काढणारे कलाकार येथे उपस्थित होते. अनेकांनी टॅटू काढून घेण्याची हौस भागविली. तर काहींचा स्वत:ला व्यंगात्मक छबीत पाहण्यासाठीचा उत्साह दिसून येत होता. विजय पारगे (अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ), दत्तात्रय पिसे (वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ), अनंता भिकुले (कार्याध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ), अरुण निवंगुणे (सचिव, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ), राम दहाड (सहसचिव, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ) व विभागप्रमुख यतीन चौधरी, भारत येनपुरे, रमेश बोराटे, संतोष मोहोळ, यशवंत वादवणे, अनिल शिंदे, अमित जाधव, सुनील पवार, अनंता केंडे, सचिन मुंगारे, संतोष श्रृंगारे, माणिक खोपडे, सुनील बरके, विनायक वाळके, अमोल सुपेकर, संग्राम गायकवाड, दिलीप निंबळे, राजेश रसाळ, अविनाश जगताप, रोहित गणेशकर, अप्पा भोसले, चेतन गणपुले, प्रशांत गणपुले, सुरेश मारवाडी, राहुल निगडे, प्रमोद परुळेकर, आनंद निंबाळकर, दिनेश गिरमे, सुनील गोगालिया, दिनकर कापरे, एकनाथ काळे, संजय भोसले, शरद वालगुडे, संतोष लोहार, प्रताप निसर्गन, आनंद वाळके, अशोक जाधव, गणेश चव्हाण, सूरज शिंदे, सुरेश कर्डिले, कृष्णकांत कांबली, राजकुमार ढमाले, महावीर बराटे, वसंत घोटकुले, सूर्यकांत भोईर, प्रवीण माने, शंकर हारपुडे, औदुंबर कळशीत, जितेंद्र मोरे, कांचन गायकवाड, उद्धव जाधव, योगेश बोटे, देविदास शेळके यावेळी उपस्थित होते.मेपल्स ग्रुपच्या सहकार्याने विक्रेत्यांना कुटुंबियांसमवेत फोटो काढण्यासाठी फोटोबुथची व्यवस्था करण्यात आली होती. एका मिनिटात मिळत असलेला फोटो पाहून विक्रेत्यांचा आनंद द्विगुणित झाला. लोकमतचा हा उपक्रम स्तुत्य आहे. विक्रेत्यांना यामुळे प्रोत्साहन मिळेल. त्यांच्यासाठी भविष्यातही असे उपक्रम राबवावेत. - सचिन अग्रवाल, अध्यक्ष, मेपल ग्रुपलोकमत नेहमीच विक्रेत्यांसाठी चांगले उपक्रम राबवित असते. असे उपक्रम भविष्यातही राबवावे. विशेषत: महिला विक्रेत्यांचा केलेला सन्मान उल्लेखनिय होता. त्या बद्दल लोकमतचे आभार. - विजय पारगे, अध्यक्ष, वृत्तपत्र विक्रेता संघलोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात वृत्तपत्र आणि विक्रेता यांच्या नात्यातील भावबंध उलगडला. लोकमतला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात विक्रेते बांधवांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांसाठी लोकमत विविध उपक्रम सातत्याने राबवून परस्परातील नाते दृढ करीत आहे. भविष्यातही लोकमत आणि विक्रेते यांच्यातील प्रेम, सहकार्य उत्तरोत्तर वाढत जाईल, असा विश्वास विजय बाविस्कर यांनी व्यक्त केला़