शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

नगरपरिषदांमध्ये लेखणी बंद!

By admin | Updated: January 31, 2015 00:32 IST

आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी राज्यातील राजपत्रित कर्मचारी महासंघ व नगर

पुणे : आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी राज्यातील राजपत्रित कर्मचारी महासंघ व नगर परिषद कर्मचारी संघटना संतप्त झाल्या आहेत. याचा निषेध म्हणून आज जिल्ह्यात सर्व नगर परिषदांमध्ये लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर व नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे यांनी गुरुवारी दुपारी हा हल्ला केला. आज याचे तीव्र पडसाद उमटले. राज्यपत्रित कर्मचारी महासंघाने पालकमंत्री गिरीश बापट यांनी निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. राज्यातील काही व जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदांमध्ये अत्यावशक सेवा वगळता कामाकाज बंद ठेवण्यात आले होते. कर्मचारी, अधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून काळ्या फिती लावून निषेधाच्या घोषणा दिल्या. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील काम वगळता सर्व कामकाज बंद होते. नागरिकांची गैरसोय होेऊ नये म्हणून नगर परिषदेतील कामकाज उद्या (शनिवारी) पूर्ववत राहील, असे गणेश शेटे यांनी सांगितले. बारामतीत नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निषेध केला. मुख्याधिकारी दीपक झिंजाड, बांधकाम अधिकारी आर. पी. शहा, राहुल दिवेकर, महेश आगवणे, सिद्धीविनायक नलगे, संजय चव्हाण, अण्णा सातव, सुनिल धुमाळ, रत्नरंजन गायकवाड, राजेंद्र सोनवणे, भाऊसाहेब प्रभुणे, देविदास साळुंके यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी झाले. औंधकर यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. हा प्रकार निंदणीय आहे. तर सदर गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी. योग्य तो बंदोबस्त शासनाने करावा, अशी अपेक्षा इंदापूरचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, फारुख काझी, रमेश शिंदे, मोहन शिंदे, सतीश तारगावकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.दौंड नगर परिषेदतील कामकाज बंद ठेवले होते. मुख्याधिकारी किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यावर असे हल्ले ही लोकशाहिला काळिमा फासणारी बाब आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाजूने कडक कायदे झाले पाहिजेत, असे दौंडचे मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी सांगितले. कर्तव्यनिष्ठ अधिकऱ्याला मारहाण होणे योग्य नाही. पोलिसांनी गुन्हेगारांना पकडावे, कठोर शासन करावे. ते नगरसेवक असतील तर त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी सासवड नगर परिषेदच्या कर्मचाऱ्यांनी पुरंदरच्या नायब तहसीलदार सुनंदा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सासवड शिंपी समाजाचे वतीनेही निषेध केला. जुन्नर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन करून निषेधाचे निवेदन जुन्नरचे तहसीलदार पी. एन. हिरामणी यांना दिले. भोर नगरपलिकेत आज सकाळ पासुनच कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केल्याने नागरीकांना काम न होताच परत जावे लागले. (प्रतिनिधी)