शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

परिंचे येथे नवविवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 02:43 IST

सासरच्या छळाला कंटाळून परिंचे येथील कांचन गणेश मोरे (वय २० ) या नवविवाहितेने शनिवारी तिच्या राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर केवळ एक वर्षातच ही घटना घडली .

सासवड : सासरच्या छळाला कंटाळून परिंचे येथील कांचन गणेश मोरे (वय २० ) या नवविवाहितेने शनिवारी तिच्या राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर केवळ एक वर्षातच ही घटना घडली .सासवड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून कांचन हिचे आजे सासरा बाबू हरिभाऊ मोरे आणि पती गणेश पोपट मोरे यांच्या विरुद्ध भा. दं. वि. क. ३०६,४९८-अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पती गणेश पोपट मोरे यास घटनेनंतर अटक केली आहे.पोलीस उपनिरीक्षक नारायण गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन व पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला; तसेच तिचा पती गणेश मोरे यास त्वरित ताब्यात घेऊन पुढील कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून सदर घराला टाळे ठोकून घर बंद करून घेतले. त्यानंतर रात्री ८ वाजता कांचन हिचे आईवडील आणि सुमारे २०० पेक्षा जास्त नागरिकांनी संतापलेल्या अवस्थेत सासवड पोलीस स्टेशनला आले. आत्महत्येमागे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे, असा आरोप करून तिच्यावर, तिच्या सासरी परिंचे येथील घरासमोर अंत्यविधी करण्याची मागणी केली. परंतु, ‘तुमच्या मुलीच्या प्रेताची हेळसांड न करता, तिच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करा,’ असे सांगून त्यांची समजूत काढल्याने जमाव शांत झाला. त्यानंतर कांचनचे वडील सतीश बाबूराव दुर्वे यांनी जावई गणेश मोरे याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. लग्नानंतर वारंवार सासरच्यांकडून पैशांची मागणी केली गेली असून त्यांना यापूर्वी पैसेही दिले होते. तिचा आजे सासरा बापू मोरे वारंवार शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत असत. घटना घडल्याच्या दिवशी सकाळी ११.२० वाजता फोन करून मला जेवणच नीट करता येत नाही म्हणून ते मारहाण करीत असून, माझे जगणे असह्य करून सोडल्याचे सांगितले होते. त्या वेळी आम्ही मुलीला घेऊन जातो, तिला त्रास देऊ नका, असेही सांगितल्याचे दुर्वे यांनी फिर्यादीत म्हणले आहे.