शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी सांडस येथे नवा कचरा प्रकल्प

By admin | Updated: June 1, 2017 01:42 IST

उरुळी देवाची येथून हलवण्यात येणारा पुणे शहराचा कचरा प्रकल्प हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथे उभारण्यास राज्य सरकारने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : उरुळी देवाची येथून हलवण्यात येणारा पुणे शहराचा कचरा प्रकल्प हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथे उभारण्यास राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. वन विभागाची असणारी १९.९० हेक्टर जागा पुणे महापालिकेच्या कचऱ्यावरील वैज्ञानिक प्रक्रिया करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट निर्णयाची माहिती दिली आहे. परंतु पिंपरी सांडस येथे कचरा प्रकल्प उभारण्यास येथील स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे.गेले काही दिवस शहराचा कचरा प्रश्न चिघळला आहे. उरुळी देवाची-फुरसुंगी येथील कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तब्बल २२ दिवस आंदोलन पुकारले होते. त्या वेळी शहरातील कचराप्रश्नाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कचरा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या घनकचरा विभागाने कचरा व्यवस्थापनाचा विस्तृत आराखडा तयार करून नुकताच महापौरांना सादर केला होता. आराखड्यावर लोकप्रतिनिधी, नागरिकांची आणि स्वयंसेवी संस्थांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यावर काम सुरू होणार आहेच; पण त्याआधी पिंपरी सांडस येथील जागेलाही मंजुरी देण्यात आली आहे. सध्या शहरात दररोज १६०० टन कचरा निर्माण होत असून त्यापैकी केवळ १००० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पमुळे संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. पुण्याचा कचराप्रश्न मार्गी लागणार ?पुण्याचा कचराप्रश्न मार्गी लावण्याच्यानिमित्ताने भाजपा आणि शिवसेना यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पिंपरी सांड्स येथे कोणत्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या खासदारांनी बोलून दाखवली. महापालिकेपासून ते केंद्र सरकारपर्यंत या प्रकल्पासाठी प्रयत्न केले तरी नियोजित प्रकल्प होऊ देणार नाही, असा निर्धार आढळराव पाटील यांनी केला आहे.पुणे महापलिकेच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. त्यामुळे उरुळी- फुरसुंगीसारखी स्थानिकांच्या विरोधाची परिस्थिती इथेही उद्भवू शकणार आहे. सत्तेत भागीदार असणाऱ्या शिवसेनेच्या खासदाराचा विरोध डावलून भाजपाने या जागेला परवानगी दिल्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे सांगण्यात येत आहे.