शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहावरील नव्या संशोधनाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:15 IST

साखर वाढणे हे फक्त मधुमेहाचे एक लक्षण आहे, ते रोगाचे मूळ नाही. मधुमेहींमधील प्रक्रियांच्या जाळ्यात साखर केंद्रस्थानी नसून आजार बरा करण्याची गुरुकिल्ली इतरत्र आहे, असा नवा अभ्यास पुढे आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : साखर वाढणे हे फक्त मधुमेहाचे एक लक्षण आहे, ते रोगाचे मूळ नाही. मधुमेहींमधील प्रक्रियांच्या जाळ्यात साखर केंद्रस्थानी नसून आजार बरा करण्याची गुरुकिल्ली इतरत्र आहे, असा नवा अभ्यास पुढे आला आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ (आयसर) या संस्थेतील शास्त्रज्ञांनी मधुमेहातील ७० हून अधिक प्रक्रियांचा परस्पर संबंध दाखवणारा संगणकीय पट तयार केला आहे. हे नवे संशोधन अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘प्लोस वन’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.गेल्या २० वर्षांच्या काळात ७० प्रकारच्या इतर रसायनांमध्ये तसेच मेंदू आणि वर्तनाच्या बारीकसारीक अंगांत बदल होत गेल्याचे सिद्ध झाले आहे. या बदलांचा परस्परांशी नेमका संबंध स्पष्ट करण्याचे काम ‘आयसर’च्या संशोधक गटाने केले आहे, अशी माहिती प्रमुख मार्गदर्शक डॉ. मिलिंद वाटवे यांनी दिली.नव्या संशोधनासाठीच्या अभ्यासात ‘नेटवर्क मॉडेल’ या तंत्राचा वापर करण्यात आला, असे संशोधक शुभंकर कुलकर्णी यांनी सांगितले. ‘कोळ््याच्या जाळ््यातील एक धागा हलवला तरी अख्खे जाळे हलते. मानवी शरीरातील रासायनिक प्रक्रियांचे जाळेही असेच आहे.काही धागे हलवले तर हे जाळे मधुमेहाचे रूप घेते आणि इतर धागे हलवल्यास जाळे मधुमेहापासून दूर जाते. या मॉडेलने मधुमेहासंदर्भात अनेक गोष्टी अचूक दाखवल्या आहेत आणि नव्या शक्यताही सूचित केल्या तर मधुमेह पूर्णपणे बरा करणे तत्त्वत: शक्य आहे, असे डॉ. वाटवे यांनी सांगितले.