शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पदपथ, पार्किंगसाठी पालिकेचे नवे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 02:49 IST

पदपथावर चालणाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेणारे तसेच वाहनांचा वाढता वापर रोखण्यासाठी उपयुक्त ठरावे, अशी अपेक्षा असलेले नवे वाहनतळ धोरण महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी

पुणे : पदपथावर चालणाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेणारे तसेच वाहनांचा वाढता वापर रोखण्यासाठी उपयुक्त ठरावे, अशी अपेक्षा असलेले नवे वाहनतळ धोरण महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज जाहीर केले. यात विनामूल्य वाहनतळ ही संकल्पना मोडीत काढण्यात आली आहे, तर पदपथांवर व्यवसाय वगैरे करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.नागरिकांसाठी हे धोरण येते १५ दिवस खुले असेल. महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच मुख्य कार्यालयात ते उपलब्ध होईल. नागरिकांनी त्यावर आपल्या सूचना द्याव्यात, त्या सर्व सूचनांचा विचार करून नंतर हे धोरण पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. शहराचा वाढता विस्तार, वाहनांची प्रचंड वाढलेली व वाढतच असलेली संख्या या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भविष्यातील पुणे सुरक्षित, सुंदर करण्यासाठी असे धोरण करण्याची गरज होती. त्यादृष्टीने महापालिकेने हे पाऊल टाकल्याचे आयुक्त म्हणाले.वाहन लावण्यासाठी जागा मिळणे हा आपला हक्कच आहे, असे प्रत्येक वाहनधारकाला वाटते. हा समज चुकीचा आहे, हे त्या शहरांनी आता मान्य केले असून, त्यांचा प्रवास उलट दिशेने म्हणजे वाहनतळांची संख्या कमी करणे, वाहन लावण्यासाठी जास्त पैसे आकारणे असा सुरू झाला. त्यांना अपेक्षित परिणाम मिळाला. येणाऱ्या वाहनांच्या संख्येतच कपात झाली असे नाही तर वाहने घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली. नव्या धोरणातही याचीच अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.असे आहे वाहनतळ धोरणवाहनतळ धोरणात अनेक मुद्द्यांचा विचार करण्यात आला असून, रस्ते हे रहदारीसाठी आहेत, वाहनतळासाठी नाहीत, हा या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. नागरिकांना खासगी वाहनाच्या वापरापासून परावृत्त करणे, हा धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यातील काही तरतुदी याप्रमाणे :-वाहनतळासाठीचे दर वाढवणे, त्यात रुग्णालये किंवा तत्सम गोष्टींसाठीच्या वाहनांना सवलत असेल.-रस्त्यावरील वाहनतळांच्या संख्येत कपात करणे-वाहनतळांच्या जागांमध्ये सुसूत्रता आणणे-वाहतळातून जमा होणारा निधी सार्वजनिक वाहतूक सुधारणा व पादचारी सुरक्षा यासाठीच वापरणे-वाहनतळावर वाहन लावण्याच्या वेळेवर दरनिश्चिती ठरवून नियंत्रण करणेअसे आहे पदपथ धोरण-पदपथावर चालणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षा मिळेल याची काळजी घेणे-रस्त्यांची रचना पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी असेल-शहरात अनेक ठिकाणी पादचारी क्षेत्र निर्माण करणे-सर्व रस्त्यांवर चालण्यासाठीच म्हणून एक निर्देशित मार्ग तयार करणे-रस्ता ओलांडण्यासाठी नियम तयार करणे