पुणो : आपल्या भोवताली होणारे संघर्ष समजून घेणो नव्या कवींना महत्त्वाचे वाटू लागले आहे. त्यामुळे आता समाजाच्या देवाण-घेवाणीमध्ये आपल्या वाटय़ाला आलेलं जगणं हे संपूर्ण समूहाशी निगडित असल्याची जाणीव झाल्याचे दिसून येते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
साधना पुणो आयोजित कवी मनोहर जाधव यांच्या ‘तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात कोत्तापल्ले बोलत होते. त्यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ग्रंथाली प्रकाशनच्या विश्वस्त लतिका भानुशाली, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, साहित्यिक वसंत डहाके, रावसाहेब कसबे, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते.
कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘संवेदनशील मनुष्य जेव्हा आपल्या आजूबाजूला बारकाईने पाहतो, तेव्हा त्याला अनेक प्रश्नांची जाणीव होते. आजच्या काळात जात-धर्म याच्याकडे एक व्यवस्था म्हणून पाहिले पाहिजे. आजचे कवी एकूण परिस्थितीचा आणि जगण्याचा विचार करताना दिसतात.’’
(प्रतिनिधी)