शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख प्रकल्पांचा नव्याने आराखडा

By admin | Updated: December 2, 2014 23:59 IST

केंद्र शासनाकडून जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान शहरी विकास योजना (जेएनएनयूआरएम) बंद करण्यात आल्याने महापालिकेचे पाणी पुरवठ्याचे दोन आणि पावसाळी गटारांचा एक प्रकल्प निधी अभावी अडचणीत

पुणे : केंद्र शासनाकडून जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान शहरी विकास योजना (जेएनएनयूआरएम) बंद करण्यात आल्याने महापालिकेचे पाणी पुरवठ्याचे दोन आणि पावसाळी गटारांचा एक प्रकल्प निधी अभावी अडचणीत आला आहे. मात्र, जेएनएनयूआरएमच्या धर्तीवर लवकरच केंद्राकडून नवीन योजना सुरू करण्याची शक्यता असल्याने हे तीनही प्रकल्प केंद्राकडे नव्याने सादर करण्यासाठी त्यांचा नवीन प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. या तीनही प्रकल्पाचे आराखडे दोन वर्षे जुने असल्याने आता या प्रकल्पांचा खर्च सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे सुधारित खर्चाचा समावेश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने आघाडी सरकारने सुरू केलेली जेएनएनयूआरएम योजना गुंडाळली आहे. मात्र, या योजनेच्या पहिल्या टप्प्यास मुदतवाढ देण्यात आल्यानंतर पर्वती जलकेंद्राचा विस्ताराचा १८१ कोटींचा प्रकल्प, पावसाळी गटार योजनेचा ४७० कोटी रुपयांचा प्रकल्प तसेच शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठीचा पाणीमीटर बसविण्याचा सुमारे २८०० कोटींचा प्रकल्प सादर केले होते.केंद्र शासनाने ही योजनाच बंद केल्याने त्याचा भार महापालिकेवर पडणार आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नसल्याने हे तीनही प्रमुख प्रकल्प रखडणार आहेत. मात्र, हे प्रकल्प पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेएनएनयूआरएमच्या धर्तीवर नवीन योजना सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने नवीन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन योजना लागू झाल्यास पालिकेचे हे सर्व प्रस्ताव कालबाह्य ठरतील तसेच केंद्राकडून सुधारित प्रस्तावही मागितले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वर्षे किमती रखडल्याने प्रकल्पांची किंमतही वाढली असल्याने २२२ नवीन सुधारित प्रस्ताव तत्काळ तयार करून ठेवण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)