शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

कोरोनाच्या लसीकरणानंतरच ‘न्यू नॉर्मल’ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:09 IST

राजानंद मोरे/प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : भारतातील कोरोनाची पहिली लाटच अद्याप ओसरलेली नाही. दुसरी लाट रोखायची असेल तर नागरिकांनी सुरक्षेचे ...

राजानंद मोरे/प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : भारतातील कोरोनाची पहिली लाटच अद्याप ओसरलेली नाही. दुसरी लाट रोखायची असेल तर नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. आपल्याकडे सामुहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नसल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लसीकरण होईपर्यंत आपण ‘न्यू नॉर्मल’ आयुष्य जगु शकणार नाही, असा स्पष्ट इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘लोकमत’च्या विशेष मुलाखतीत सांगितले.

-----------

देशातील सध्याच्या कोरोनाच्या स्थितीबाबत काय सांगाल? दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का?

- देशात लॉकडाऊनमध्ये लोकांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आपल्याकडे प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी कोरोनाची पहिली लाट आली. आपल्याकडची पहिली लाट अजूनही ओसरलेली नाही. ती ओसरत नाही तोवर दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधता येणार नाही. दुसरी लाट दिसत नसली तरी वेगवेगगळ्या शहरांत वेगवेगळ्या वेळेत ही लाट येऊ शकते. दक्षता घेतली तर कदाचित आपण दुसऱ्या लाटेला रोखु शकु. इतर देशांमध्ये जो परिणाम दिसतोय तो आपल्या देशात दिसणार नाही.

---------

जगभरात सुरू असलेल्या लशींच्या विकसन प्रक्रियेकडे कसे पाहता?

- जगात यापुर्वीही कधीही १० ते ११ महिन्यांमध्ये लस विकसित झाली नव्हती. सध्या भारताता आठ लसी चाचणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. फायझर, मॉडर्ना, स्पुटनिक या लसींची परिणामकारकता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य संघटनेने लसीची परिणामकारकता ५० टक्क्यांहून अधिक असली तरी चालेल, असे म्हटले होते. लस विकसित करताना प्रतिकारशक्ती जागृत करणाऱ्या स्पाईक प्रोटिनचा वापर करण्यात आला आहे. भारतातही या प्रोटिनचा वापर झाल्याने परिणामकारक निकाल हाती येतील.

---------------

लसीचा एक डोस घेतल्यानंतर हरयाणाचे मंत्री कोरोनाबाधित झाले, यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते का?

- चाचणीमध्ये ५० टक्के लोकांना प्रत्यक्ष लस आणि ५० टक्के लोकांना प्लासबो (अपरिणामकारक लससदृश द्रवपदार्थ) दिला जातो. या मंत्र्यांना प्रत्यक्ष लस मिळाली की प्लासबो दिला ते पाहावे लागेल. तसेच त्यांना दुसरा डोस दिला नव्हता. लस मिळाली असली तरी पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. त्यानंतरच प्रतिकारशक्ती निर्माण होते. मंत्र्यांना अर्धवट डोस झाल्याने लागण झाली. एकच डोस घेऊन जर आपण दक्षता घेतली नाही तर ते चुकीचे ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीने दोन डोस घेणे जरूरीचे असते.

-----------------

कोरोनाला रोखण्यासाठी भारतात किती लोकांना लस द्यावी लागेल?

- काही अभ्यासांनुसार ५५ ते ८० टक्के लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या किंवा लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर त्याला ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणता येईल. आपल्याकडे सप्टेंबरमध्ये झालेल्या सिरो सर्व्हेमध्ये ६ टक्के म्हणजे सुमारे ८ कोटी लोकांना लागण होऊन गेलेली असावी, असे आढळून आले. डिसेंबरमध्ये ही संख्या तिप्पट झाली तरी सुमारे २४ ते २५ कोटी लोकांना लागण झाली असे म्हणता येईल. हे प्रमाण भारतात ७० टक्क्यांपर्यंत जाणारे नाही. त्यामुळे आपल्याला लस द्यावीच लागणार आहे. आता हे प्रमाण किती असेल, हे आताच सांगता येणार नाही. पण आपण निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार लसीकरण करण्यासाठी जुन-जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत २५ कोटींचा आकडा काहीप्रमाणात वाढलेला असेल. त्यावेळी हर्ड इम्युनिटीचा अंदाज बांधता येईल. त्यानुसार पुढील लसीकरण करावे लागेल.

--------------

आपले आयुष्य ‘न्यु नॉर्मल’ कधी होईल?

- आपण लस घेतली म्हणजे सुरक्षित नाही. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर एक महिना होत नाही तोपर्यंत आपल्याला मास्क, शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता या नियमांचे पालन करून जगणे आवश्यकच आहे. पुर्ण लसीकरण होईपर्यंत आपण ‘न्यु नॉर्मल’ आयुष्य जगु शकणार नाही.

--------------

चौकट १

गर्दी वाढूनही रुग्णांची संख्या कमी दिसत असल्याने हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे का, याविषयी बोलताना ते म्हणाले, हर्ड इम्युनिटी निर्माण झालेली नाही. तसे असते तर पुण्या-मुंबईसह अन्य शहरांमध्ये लोकांना लागण झाली नसती. नवीन लोकांमध्ये लागण झाल्याची संख्या जवळजवळ नाही इथपर्यत आलेली दिसली असती. अजूनही कुठल्याही राज्यात हजारोंच्या संख्येत लागण होतेय. काही देशांतील परिस्थितीकडे पाहून असे वक्तव्य काहींनी केले असेल. त्याच्याशी आपली तुलना करणे योग्य नाही. आपल्याकडे अजून पहिली लाटच संपलेली नाही. अशा परिस्थितीत लस न देणे, असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल.

---------------

चौकट २

जोखीम घ्यायला हवी

मानवी चाचण्यांदरम्यान देण्यात आलेल्या लसींचा दुष्परिणाम जास्त असता तर तो पहिल्या दोन महिन्यांमध्ये दिसला असता. त्यामुळे याचा फार मोठा दुष्परिणाम होईल, अशी भिती मनात ठेऊ नये. काही दुष्परिणाम लसीकरणानंतर दीड वर्षानंतरही दिसू शकतात. पण याकडे आपण फायद्याच्या दृष्टीने पाहायला हवे. कारण ९५ टक्के लोकांमध्ये आता दुष्परिणाम दिसलेले नाहीत. त्यामुळे थोडी जोखीम उचलायला हरकत नाही.

--------------