शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नव्या महापौरांचा लंडन दौऱ्यावर जाण्यास नकार

By admin | Updated: February 27, 2016 04:36 IST

स्मार्ट सिटीसाठी होत असलेल्या महापालिका आयुक्त व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लंडन दौऱ्यात सहभागी होण्यास नवे महापौर प्रशांत जगताप यांनीही आज नकार दिला.

पुणे : स्मार्ट सिटीसाठी होत असलेल्या महापालिका आयुक्त व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लंडन दौऱ्यात सहभागी होण्यास नवे महापौर प्रशांत जगताप यांनीही आज नकार दिला. पुण्यासमोर अनेक प्रश्न आहेत, ते मला महत्त्वाचे वाटतात; मात्र माझा आयुक्तांनी जाण्यास विरोध नाही, त्यांचे कार्यक्रम पूर्वनियोजित आहेत, असे महापौरांनी सांगितले.नगरविकास विभागाने आयुक्त कुणाल कुमार यांच्या या दौऱ्याला हरकत घेतली असल्याचा आरोप नगरसेवक संजय बालगुडे यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केला होता. त्यावर काहीही मत व्यक्त न करता, या दौऱ्याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वत:च आज सांगितले. उद्या (शनिवार) रात्रीच ते मुंबईला रवाना होणार असून, २८ फेब्रुवारीला ते लंडनला जाणाऱ्या विमानात बसतील. त्यांच्या समवेत शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, उपायुक्त (विशेष) अनिल पवार हे पालिकेतील प्रमुख अधिकारीही त्यांच्या समवेत आहेत. महापालिकेचे सन २०१६-१७चे अंदाजपत्रक स्थायी समितीकडून २९ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभेत सादर होत असून, त्याच्या आधीच म्हणजे २८ फेब्रुवारीला आयुक्त महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसमवेत लंडनला जात आहेत. हे योग्य नाही, त्यामुळे त्यांना त्यांचा दौरा पुढे ढकलण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी महापौर जगताप यांना दिले होते. पत्र मिळाले, मात्र आयुक्तांचा दौरा पूर्वनियोजित आहे, त्यामुळे आता त्यावर काही करता येणे शक्य नाही, असे महापौर जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)