शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

अंदाजपत्रकातून पुन्हा नवी स्वप्ने

By admin | Updated: January 10, 2016 03:57 IST

मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात दाखवलेली स्वप्नं, स्वप्नंच राहिलेली असताना प्रशासनाने सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात नवी स्वप्न दाखवण्याची तयारी चालवली आहे.

पुणे : मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात दाखवलेली स्वप्नं, स्वप्नंच राहिलेली असताना प्रशासनाने सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात नवी स्वप्न दाखवण्याची तयारी चालवली आहे. जुन्या अंदाजपत्रकातील अनेक योजना अपुऱ्या आहेत, तर काही योजनांना साधी सुरुवातही होऊ शकलेली नाही. भामा-आसखेडसारखी पाणी योजना अर्धवट राहिली आहे, तर वाय मॅक्ससारख्या योजनेला मुहूर्तच लाभलेला नाही.२०१५-१६ च्या अंदाजपत्रकाची मुदत आता पूर्ण होत आली आहे. अखेरचे काही महिने शिल्लक राहिले आहेत. या अंदाजपत्रकावर दृष्टिक्षेप टाकला असता पालिका प्रशासनाचे अपयशच नजरेत येते. पुण्याचा आय. टी. हब म्हणून देशभरात होणारा बोलबाला लक्षात घेऊन प्रशासनाने मागील वर्षी इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणारे वाय-मॅक्स तंत्रज्ञान संपूर्ण शहरात सुरू करण्याचे अंदाजपत्रकात नमूद केले होते, त्याचा साधा आरंभही प्रशासनाला करता आलेला नाही. त्यासाठी केलेली १ कोटी रुपयांची तरतूद आता मार्च अखेरीस दुसरीकडे वर्ग करून वापरण्यात येईल. आय. टी. हब म्हणून पुण्याच्या लौकिकात भर टाकेल, असे काहीही पालिका प्रशासनाला करता आलेले नाही.मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, भामा-आसखेड योजनांच्या बाबतीतही असेच झाले आहे. भामा-आसखेड योजनेचे काही काम झाले, मात्र अजूनही ही योजना पूर्णाशांने सुरू झालेली नाही. केंद्र सरकारच्या निधीतून शहरात एकूण ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार होती. हे कामही पुर्ण झाले असे म्हणता येण्यासारखी स्थिती नाही. उड्डाणपुलांच्या बाबतीतही पालिका प्रशासनाला गती दाखवता आलेली नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर आजही उड्डाणपुलांची गरज आहे. वाहतूक सुधारणेसाठी असे उड्डाणपुल बांधण्याला प्राधान्य देण्यात येणार होते. मात्र स्वारगेट, धनकवडी व संचेती येथील उड्डाणपूल वगळता प्रशासनाला यात यश आलेले नाही.आर्थिक निकषावर भर : २२ नोव्हेंबरला दिल्लीत धडकणारमागील वर्षाचे अंदाजपत्रक साडेचार हजार कोटी रूपयांचे होते. त्यातील योजना अशा अपुऱ्या राहिलेल्या असतानाच प्रशासन आता पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करीत आहे. त्यामुळे त्यातूनही हाती काय पडते हा प्रश्नच आहे. यंदाचे अंदाजपत्रक काही हजार कोटी रूपयांचे असणार आहे. त्यातही वाहतूक सुधारणेसाठी बीआरटी मार्गांचे जाळे, संपुर्ण शहराला २४ तास पाणी पुरवठा अशा काही स्वप्नवत वाटणाऱ्या योजनांचा समावेश असण्याची शक्यता आहे.