शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवचनाच्या माध्यमातून मिळते नवी दिशा

By admin | Updated: November 30, 2015 01:43 IST

चातुर्मासामध्ये संतांच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळते व सत्कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते.

पिंपरी : चातुर्मासामध्ये संतांच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळते व सत्कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. आम्ही जातो पुढच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असे मत जैन साधू प्रशांत ऋषीमहाराज यांनी कासारवाडी येथे व्यक्त केले. चातुर्मासानिमित्त कासारवाडी जैनस्थानकामध्ये प्रवचन भास्कर, समतासाधक प्रशांतऋषी महाराज आणि करुणामूर्ती परमपूज्य अचलऋषी महाराज यांचा चातुर्मास अनेक धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाला. चातुर्मास समाप्तीनिमित्त बिदाई समारंभ संघाच्या वतीने घेण्यात आला. या वेळी प्र्रशांतऋषीमहाराज म्हणाले, ‘‘कासारवाडी येथे चातुर्मासामध्ये कासारवाडी संघाच्या सर्व भाविकांनी अत्यंत उत्साहाने सर्व कार्यक्रमांत सहभागी होऊन हा चातुर्मास आध्यात्मिक व सामाजिक दृष्टीने यशस्वी केला. संघ संख्येने लहान असला, तरी येथील भाविकांमध्ये आपल्या संतांबद्दल आणि धर्माबद्दल नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे या चातुमार्सामध्ये तप, जप, प्रवचन व अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर झाले. चातुर्मासामध्ये संतांच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळते व सत्कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. ‘‘लेकर संघ की सेवा अपार, जाने का अब हम करते विचार, कई गाव देखे कई शहर देखे, लोगो के दिल पत्थर जैसे होते है, लेकिन कासारवाडी में देखा, पत्थर को भी दिल होता है.’’या वेळी अनेकांनी संतांबद्दल व चातुर्मासाबद्दल मनोगत व्यक्त केले. वसंतलाल बोरा, विलास पगारिया, किशोर मुनोत, जवाहरलाल भंडारी, रमणलाल शिंगवी, शांतिलाल फुलपगर, श्रेयस पगारिया, तसेच इंदिरा बोरा, आशा कर्नावट, सुशीला भंडारी, पुष्पा कर्नावट, सुमन फुलपगर, श्रुती पगारिया, भाग्यश्री भंडारी, कीर्ती कर्नावट, नितल फुलपगर, वंदना कुवाड, प्रा. अशोक पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. पगारिया यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)