शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवीन अभ्यासक्रम नाकारले, प्राचार्य नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:39 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना प्राचार्य नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रमांना परवानगी नाकारली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना प्राचार्य नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रमांना परवानगी नाकारली आहे. मात्र, शासनाकडूनच प्राचार्य व प्राध्यापक भरतीवर बंदी आहे. त्यामुळे विद्यापीठाने सर्व गोष्टींचा विचार करून शैक्षणिक निर्णय घ्यावेत, अशी पेक्षा प्राचार्य संघटनेच्या पदाधिकाºयांकडून केली जात आहे.विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना दरवर्षी संलग्नतेचे नुतनीकरण करावे लागते. त्याच प्रमाणे पूर्वी ३१ आॅक्टोबरपर्यंत नवीन अभ्यासक्रमांच्या मान्यतेचे प्रस्ताव स्वीकारले जात होते. यंदा हा कालावधी एक महिना अलिकडे घेण्यात आला आहे. परिणामी सप्टेंबर महिन्यात सर्व महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाकडे प्रात झाले. परंतु, नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार नॅक मुल्यांकन करून न घेतलेल्या व प्राचार्य नसलेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रमांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. काही वर्षांपूर्वी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील विद्यापीठांनी प्रचार्य व प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार टप्प्याने टप्प्याने प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे प्रवेश थांबविले जात होते. महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी न देण्याची कार्यवाही विद्यापीठाकडून केली जात आहे.>३२ महाविद्यालयांना प्राचार्य नाहीपुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये १६७ अनुदानित महाविद्यालये आहेत. त्यातील ३२ महाविद्यालयांना प्राचार्य नाहीत.तसेच अनेक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांना प्राचार्य नसल्याचे विद्यापीठातील अधिकाºयांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे या महाविद्यालयांना यंदा नवीन अभ्यासक्रम सुरू करता येणार नाहीत,अशी स्थिती निर्माण झाली आहे.शासन व विद्यापीठाच्या धोरणात विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयांची पिळवणूक होत आहे. शासनाने प्राचार्य भरतीवरील बंदी उठवली तरच महाविद्यालयांना प्राचार्य मिळतील. तसेच नॅककडूनही एप्रिल २०१७ पासून प्रस्ताव स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे केवळ नॅक मुल्यांकन नाही म्हणून नवीन अभ्यासक्रमांना परवानगी नाकारणे चूकीचे आहे.- प्रा.नंदकुमार निकम, माजी अध्यक्ष, प्राचार्य महासंघप्राचार्य व प्राध्यापक भरतीसाठी मागासवर्गीय कक्षाकडून काही वेळा सहा महिने ते दोन वर्षे रोष्टर तपासून मिळत नाही. त्यामुळे प्राचार्य पद रिक्त राहते. तसेच अनेक वर्षांपासून भरतीबाबत अडचणी येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमधील ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. परिनामी नॅकला सामोरे जाणेही संयुक्तीक होत नाही. विद्यापीठाने अशा बाबींचा विचार करावा.तसेच शासनाने महाविद्यालयांना या दृष्ट चक्रातून सोडवावे.- डॉ.सुधाकर जाधवर, सचिव, प्राचार्य महासंघ

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ