शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कामे रखडलेली असताना नव्याने घोषणा

By admin | Updated: April 29, 2017 03:59 IST

गेल्या वर्षीचीच कामे मार्गी लागली नसताना, नव्या वर्षात १५ गावांसाठी योजना राबवण्याचे जाहीर करण्यासाठीच सारा प्रपंच केला होता

इंदापूर : गेल्या वर्षीचीच कामे मार्गी लागली नसताना, नव्या वर्षात १५ गावांसाठी योजना राबवण्याचे जाहीर करण्यासाठीच सारा प्रपंच केला होता की काय, असे वाटावे, अशा पद्धतीने गुरुवारी (दि. २७) पंचायत समितीच्या सभागृहात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक पार पडली. शेवटची काही मिनिटे खासदार सुप्रिया सुळे यांनी या बैठकीस हजेरी लावली.गेल्या वर्षी न्हावी, रुई, अकोले, भादलवाडी, पोंदवडी, मदनवाडी, शेटफळगढे,भरणेवाडी, शेळगाव, अंथुर्णे, बावडा, वकीलवस्ती, सुरवड, भोडणी व गोखळी ही पंधरा गावे जलयुक्त शिवार अभियानात निवडण्यात आली होती. शासकीय आकडेवारी नुसार प्रस्तावित आराखड्यात ३५७ कामांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी १६५ कामे पूर्ण, १९ कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले होते. या कामांवर १ कोटी ३५ लाख ४० हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीला आमदार दत्तात्रय भरणे यांनी ज्या ठिकाणची कामे सुचवली जातील, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करुनच, कामांना मंजुरी द्यावी. भविष्यात त्या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानातील कामे करण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीचे दर्जेदार काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी गेल्या वर्षी या अभियानाच्या निमित्ताने अपेक्षित शिवार फेऱ्याच झाल्या नाहीत, ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. कामांचे आराखडे कार्यालयातच तयार करण्यात आले असावेत म्हणूनच यातील अनेक कामे अपूर्ण राहिली असावीत, असे सांगून पाणी फाउंडेशनचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरु आहे. जलयुक्त शिवाराच्या कामात पाणी फाउंडेशनला समाविष्ट करुन घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.प्रांताधिकारी हेमंत निकम म्हणाले, की बिलो टेंडरमुळे होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे. मे महिन्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या निमित्ताने शिवार फेऱ्या करण्यात येतील. सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामसभेतच या अभियानातील कामांना मंजुरी घेण्यात यावी. तलाव किंवा ओढ्याच्या बांधाला, जॅकवेलला धक्का न पोहोचू देता गाळ काढावा. तो शेतातच जाईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.(वार्ताहर)