शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

असा न व्हावा ‘दहावा’ कधी...

By admin | Updated: August 11, 2014 04:06 IST

माळीण दुर्घटनेत १५१ जण दगावले. या सर्व मृतांचा सामूहिक दशक्रिया विधी रविवारी (दि. १०) माळीण फाट्यावर होणार आहे

घोडेगाव : माळीण दुर्घटनेत १५१ जण दगावले. या सर्व मृतांचा सामूहिक दशक्रिया विधी रविवारी (दि. १०) माळीण फाट्यावर होणार आहे. एकाच वेळी एवढ्या मृतांचा दशक्रिया विधी होण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ असेल. विधीसाठी या सर्वांचे एकच पिंड बनविले जाणार असून, या कार्यक्रमास सुमारे ८ ते १० हजार लोक येतील असा अंदाज आहे. ३० जुुलै रोजी माळीण दुर्घटना घडली. तेव्हा आठ दिवस मदतकार्य सुरू होते. या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले. जेव्हा शेवटचा मृतदेह बाहेर निघेल व हे मदतकार्य थांबेल तेव्हा दशक्रिया विधीची तारीख ठरवू, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. त्यानुसार बुधवारी (दि. ६) मदतकार्य पूर्ण झाले व ग्रामस्थांनीच दि. १० रोजी सामूहिक दश्क्रिया विधी करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व प्रशासनाचे सर्वच विभाग करत आहेत. माळीण गावातील शाळेपासून दशक्रियेसाठी नागरिक निघतील व माळीण फाट्यावर दशक्रिया विधी होईल. या वेळी डिंभे येथील वैभवमहाराज राक्षे यांचे प्रवचन होणार असून, सर्व मृतांचे एकच पिंड बनवून दशक्रिया विधी होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व विधिवत धार्मिक विधी होणार असल्याचेपांडुरंगमहाराज येवले यांनी सांगितले आहे. दशक्रिया विधीला मोठ्या संख्येने जनसमुदाय जमणार हे पाहून माळीण फाट्याकडे येण्यासाठी डिंभे ते अडिवरे व तळेघर ते माळीण फाटा असे दोन रस्ते तयार करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांना डिंभे ते अडिवरे या रस्त्याने येथे पोहचता येईल व जाताना तळेघर मार्गे सोडले जाणार आहे. दशक्रिया विधीला येण्यासाठी कोणालाही अडवले जाणार नाही. वाहनतळामध्येच गाड्या लावाव्यात, रस्त्याच्या कडेला गाड्या लावू नयेत. डिंभे ते अडिवरे हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूककोंडी होते. येणाऱ्या लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी केले आहे. (वार्ताहर)