शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

टेबल टेनिसमध्ये नील, पृथा अजिंक्य

By admin | Updated: July 8, 2017 02:38 IST

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित जिल्हा मानांकन टेबल अ‍ेनिस स्पर्धेत नील मुळ्ये आणि पृथा वर्टीकर यांनी १२ वर्षांखालील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित जिल्हा मानांकन टेबल अ‍ेनिस स्पर्धेत नील मुळ्ये आणि पृथा वर्टीकर यांनी १२ वर्षांखालील वयोगटात अनुक्रमे मुलांच्या तसेच मुलींच्या गटातील विजेतेपदाला शुक्रवारी गवसणी घातली. ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने पीवायसी हिंदू जिमखान्याच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू आहे. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित नीलने अव्वल मानांकित दक्ष जाधवला ३-०ने सहजपणे चकित करीत बाजी मारली. ही लढत नीलने १२-१०, ११-९, ११-९ अशी जिंकली. या वर्षी जबरदस्त फॉर्मात असलेल्या पृथाने मुलींच्या गटाचे विजेतेपद आपल्या नावे करताना राधिका सकपाळवर ११-६, ११-८, ११-६ने मात केली. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राज्य मानांकन स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. त्याआधी इंदूर येथे झालेल्या पूर्व विभागीय राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले होते. १५ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित मृण्मयी रायखेलकर हिने इशा जोशीचे आव्हान ११-६, ११-३, ११-३ने संपवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. राधिका सकपाळने रीमा देसलेचा १३-११, ११-६, ११-७ने पराभव केला. तिसऱ्या मानांकित अनीहा डिसुझाने प्रीशा बुधीराजा हिच्यावर ११-२, ११-७, ११-७ने सरशी साधली. १२वी मानांकित सिद्धी आचरेकर ५ गेमच्या कडव्या झुंजीनंतर मयुरी ठोंबरेकडून २-३ने पराभूत झाली. पचव्या मानांकित मयुरीने ही लढत ११-७, ७-११, १३-११, ६-११, ११-६ ने जिंकली. दुसरी मानांकित पृथा वर्टीकर, स्वप्नाली नारळे, प्रीती गाझवे यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून अंतिम ८ खेळाडूंत प्रवेश केला. निकाल १२ वर्षांखालील मुले : उपांत्य फेरी : दक्ष जाधव विवि सम्यक मोटलिंग ११-९, ११-१, ११-६. नील मुळ्ये विवि वेदांग जोशी ११-९, १२-१०, ८-११, ११-३; अंतिम फेरी : नील मुळ्ये विवि दक्ष जाधव १२-१०, ११-९, ११-९; १२ वर्षांखालील मुली : उपांत्य फेरी : पृथा वर्टीकर विवि पृथा आचरेकर ११-६, ११-०, ११-९. राधिका सकपाळ विवि देवयानी कुलकर्णी ११-६, १२-१०, ११-७; अंतिम फेरी : पृथा वर्टीकर विवि राधिका सकपाळ ११-६, ११-८, ११-६; १५ वर्षांखालील मुली : उपउपांत्यपूर्व फेरी : मृण्मयी रायखेलकर विवि इशा जोशी ११-६, ११-३, ११-५. राधिका सकपाळ विवि रीमा देसले १३-११, ११-६, ११-७. मयुरी ठोंबरे विवि सिद्धी आचरेकर ११-७, ७-११, १३-११, ६-११, ११-६. पूजा जोरावर विवि देवयानी कुलकर्णी २-११, ११-५, ११-५, ११-२. अनीहा डिसुझा विवि प्रिशा बुधिराजा ११-२, ११-२, ११-७. प्रीती गाढवे विवि धनश्री पवार ११-३, ११-५, १५-१३. स्वप्नाली नारळे विवि प्रीती साळुंखे ११-७, ११-८, ११-५. पृथा वर्टीकर विवि पृथा आचरेकर ११-४, ११-२, ११-३; १५ वर्षांखालील मुले : तिसरी फेरी : करण कुकरेजा विवि अथर्व चांदोरकर ११-६, ११-४, ११-३. अक्षय पाटणकर विवि अर्णव भालवणकर ११-६, ११-१३, ११-४, ११-५. सनत जैन विवि अनिरूद्ध श्रीराम ११-४, ११-३, ११-१. नवनीत श्रीराम विवि प्रियान शिरस ११-५, ११-५, ११-७. साई बगाटे विवि अक्षय बोथरा ११-३, ११-५, ११-५. नील मुळ्ये विवि हार्दीक क्षीरसागर ११-५, ११-५, ११-५. तेजस मंकेश्वर विवि सम्यक मोटलिंग ११-७, ५-११, ११-८, ११-९. अर्चन आपटे विवि आर्यन इंगळे ११-४, ११-६, ११-९. वेदांग जोशी विवि असीम केळकर ११-६, ११-५, ११-९. मिहिर ठोंबरे विवि अथर्व खरे ११-४, ११-७, ११-३. भार्गव चक्रदेव विवि पार्थ चाफेकर ११-५, ११-३, ११-८. आदित्य जोरी विवि प्रणव कुलकर्णी ११-५, ११-४, ७-११, ११-०. आरूष गलपल्ली विवि कौशल कुलकर्णी ११-८, ११-८, ११-४.