राहुल शिंदेपुणे : गेल्या वर्षभरात राज्यात १,५३९, तर पुणे शहरात केवळ १०८ भिका-यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या महिला व बाल विकास विभागातर्फे राबविलेल्या जात असलेल्या ‘महाराष्ट्र भिकारीमुक्त अभियाना’स पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, ‘भिकारी’ या प्रश्नाकडे सामाजिक समस्या म्हणून पाहून ती समस्या दूर करण्यासाठी सर्व समाजाने व पोलिसांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाºयांकडून केली जात आहे.पुण्यासह राज्यभरात लहान मुलांची चोरी करून त्यांना भीक मागण्यास लावण्याच्या घटना समोर येत आहेत. तसेच, शहरातील प्रत्येक मोठ्या सिग्नल जवळ लहान मुले व तरुण व वृद्ध भीक मागताना दिसतात. दिवसेंदिवस भीक मागणाºयांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आणि धर्मादाय कार्यालयाच्या सहकार्याने भिकारीमुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनातर्फे १५ आॅगस्ट २०१७ ते २६ जानेवारी २०१८ या कालावधीत ‘महाराष्ट्र भिकारीमुक्त अभियान योजना’ राबविली जात असून, तिला २६ जानेवारी २०१८ पासून पुढे आणखी ६ महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.‘भिक्षा प्रतिबंधक कायदा १९५८’ महाराष्ट्रात सर्वप्रथम लागू करण्यात आला. त्यानंतर देशातील इतर राज्यांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली.भीक मागणे आणि भीक देणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी भीक मागणाºयांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक वर्षांपासून प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. गृह विभागाने गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षा महिला व बाल विकास विभागाच्या भिक्षा प्रतिबंधक शाखेच्या सहायक आयुक्त सुवर्णा पवार यांनी व्यक्त केली.पुण्यातील कारवाईशहरातील विविध ठिकाणी भीक मागणाºयांची संख्या मोठी दिसून येत असली, तरी २०१७ या वर्षात केवळ १०८ भिकाºयांवर कारवाई करण्यात आली. त्यात ८६ तरुण व वृद्धांचा, तर २२ लहान मुलांचा समावेश आहे. या लहान मुलांमध्ये १० मुले व १२ मुलींवर भीक मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.गेल्या सहा महिन्यांत भिक्षेकरी स्वीकार गृहात दाखल झालेल्या भिकाºयांची आकडेवारीस्वीकार केंद्राचे नाव अटक भिक्षेकरी जामिनावर सुटका संस्थेतील दाखलपुरुष भिक्षेकरी स्वीकार केंद्र, चेंबूर १,१३० १,१०८ २२महिला भिक्षेकरी स्वीकार केंद्र, चेंबूर १७५ १६१ १४शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्र, येरवडा ११९ ८८ १६शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्र, साता ०२ ०० ०२शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्र, विसापूर, अ.नगर १७ १२ ०५पुरुष भिक्षेकरी स्वीकार केंद्र, नागपूर, ४५ २९ १६महिला भिक्षेकरी स्वीकार केंद्र, नागपूर, ३४ २८ ०६महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, औरंगाबाद ०९ ०१ ०८एकूण १५३९ १४३१ ८७सार्वजनिक ठिकाणी भीक मागणे, देणे व घेणे गुन्हा आहे, हे माहीत असूनही भिकाºयांच्या माध्यमातून समाजात आळशी प्रवृत्ती जागृत ठेवली जात आहे. तसेच, अनेकांना त्यांचा सन्मान विकून भीक मागण्यास लावले जात आहे. पोलिसांना हा सर्व प्रकार दिसत असूनही त्यांच्याकडून भिकाºयांवर कारवाई करण्याबाबत दुर्लक्ष केले जाते. गृह विभागासमोर अनेक प्रश्न आहेत; परंतु त्यांनी भिकाºयांवर कारवाई करण्याचा प्राधान्यांने विचार केला पाहिजे.- सुवर्णा पवार,आयुक्त, भिक्षा प्रतिबंधक शाखा
भिकारीमुक्त मोहिमेकडे पोलिसांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:42 IST