शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाने अपेक्षांची केली उपेक्षा

By admin | Updated: February 2, 2017 04:03 IST

नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात काही विशेष असेल अशी अपेक्षा होती. करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ

नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात काही विशेष असेल अशी अपेक्षा होती. करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ, करांचे दर कमी करणे, गुंतवणुकीतील कर बचतीवर अधिक प्रोत्साहन मिळणे अशा सर्वसामान्यांच्या अपेक्षा, हा अर्थसंकल्प काही पूर्ण करीत नाही. बांधकाम क्षेत्राला सवलती दिल्याने व्यावसायिकांबरोबरच नागरिकांनादेखील फायदा मिळणार असल्याने ही एक जमेची बाब ठरेल. मराठा चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर या संस्थेचे कोषाध्यक्ष चंद्रशेखर चितळे यांनी अर्थसंकल्पावरील आपली मते ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मांडली. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये करदात्यांची आकडेवारी दिली. त्यानुसार लोकसंख्येपैकी केवळ ३.७० कोटी नागरिकच विवरणपत्रे सादर करतात. त्यांपैकी ७६ लाख व्यक्ती रुपये ५ ते पन्नास लाख, तर १.७२ लाख नागरिक ५० लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न दाखवितात. जर गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यास सव्वा कोटी गाड्यांची विक्री झाली असून, २०१५ सालात २ कोटी नागरिकांनी परदेशवारी केली आहे. असे सांगून अर्थमंत्र्यांनी करलपवेगिरीवर सूचक वक्तव्य केले. आगामी काळात अधिकाधिक नागरिकांना करप्रणालीच्या कक्षेत आणणार असून, त्या पद्धतीनेच त्यांचे धोरण आहे. कर लपविणाऱ्या व्यक्तींच्या मागे तगादा लावून त्यांना दंड भरण्यासही भाग पाडले जाईल. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे होणारे अन्यायाचे परिमार्जन यातून होईल. लहान करदात्यांना काहीशी सवलत देऊ केली आहे. मात्र, करमुक्त उत्पन्नाची अडीच लाख रुपयांची मर्यादा तशीच कायम ठेवण्यात आली आहे. तर अडीच ते ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना दहाऐवजी ५ टक्के कर आकार पडेल. तर एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींचा अधिभार आता ५० लाख रुपयांच्या उत्पन्नापासून लागू होईल. हा कराचा दर १० टक्के असणार आहे. गुंतवणुकीमधून करावयाच्या कर वजावटीचे कलम ८० सीची दीड लाखांची मर्यादा कायम ठेवण्यात आली नसून, गृहकर्ज मुद्दल व व्याजाच्या वजावटीतही बदल केलेला नाही. वैयक्तिक करदात्यांसाठी ही निराशेची बाब आहे. ज्या व्यावसायिकांची उलाढाल २ कोटी रुपयांपर्यंत असेल, त्यांनी उलाढालीच्या किमान ८ टक्के उत्पन्न दाखविल्यास त्यांच्या खर्चाची तपासणी होत नसे. आता बँकेच्या माध्यमातून होणाऱ्या उलाढालीवर २५ टक्के सूट देण्यात आली असून, उत्पन्न मात्र ६ टक्के इतकेच मानण्यात येणार आहे. जमीनविक्री करून होणारा भांडवली नफा व जमीन तीन वर्षांपर्यंत राखल्यास दीर्घकालीन नफा समजून त्यावर सवलतीची कर आकारणी होत होती. या सवलतीसाठी ३ वर्षांऐवजी २ वर्षे जमीन ठेवली तरी चालेल असा बदल करण्यात आला आहे. याशिवाय जमीन विकसनाचा जॉइंट डेव्हलपमेंट करार केल्यास भांडवली नफा कर लगेच भरावा लागतो. त्याऐवजी पूर्ण प्रकल्प झाल्यनंतर भांडवली नफ्यावरील कर भरण्याची सवलत देण्यात आली आहे. घरावरील सेवा शुल्कात वाढ केलेली नाही. किफायतशीर घरांच्या बांधणीसाठी बांधकाम व्यावसायिकांना चांगल्या सवलती दिल्या आहेत. महानगरांमध्ये १ हजार चौरस मीटर क्षेत्रावर, तर इतर शहरांमध्ये २ हजार चौरस मीटर क्षेत्रावर घरबांधणी प्रकल्पापासून मिळणारा नफा करमुक्त केला आहे. घराच्या बिल्टअप क्षेत्रावर मेट्रोमध्ये ३० चौरस मीटर, तर अन्य ठिकाणी ६० चौरस मीटरची मर्यादा आहे. ती शिथिल करून चटई क्षेत्र ३० व ६० चौरस मीटर असे करण्यात आले आहे. तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३ ऐवजी ५ वर्षांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धात्मक पातळीवर घरांच्या किमती काहीशा घटतील असे चित्र आहे. गृहकर्जाच्या व्याजावरील २ लाख ही कमाल मर्यादा व मुद्दल परतफेडीवरील कमाल मर्यादेत वाढ होईल, ही अपेक्षा मात्र फोल ठरली आहे. विमुद्रीकरणामुळे (Þडिमोनेटायझेशन) गृहकर्जावरील व्याजदरात घट होत असल्याने सामान्य नागरिकांना घर खरेदी करणे शक्य होणार आहे. किमान तसा विचार नागरिक करतील, असे वाटते. याशिवाय प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेद्वारे ग्रामीण भागातील स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार मोठी मदत करणार आहे. त्यामुळे ‘आपले घर’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात चार पावले अधिकच पडली असल्याचे मान्य करावे लागेल.