शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षेकडे कंपन्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 10, 2017 03:55 IST

गेली अनेक वर्षे आम्ही महिलांच्या सुरक्षेसंदर्भात काम करतो आहोत. आयटी कंपन्या हा सेक्टर अलीकडे निर्माण झाला. या कंपन्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेली अनेक वर्षे आम्ही महिलांच्या सुरक्षेसंदर्भात काम करतो आहोत. आयटी कंपन्या हा सेक्टर अलीकडे निर्माण झाला. या कंपन्या सुरक्षेच्या संदर्भात आपल्याकडील महिला कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी घेत नाही, असे माझे निरिक्षण आहे. सरकारने कायदे बनवले आहेत, नियम केले आहेत, पण ते कधीही पाळले जात नाहीत. या कंपन्यांकडील कँटिन सुविधा, ड्रायव्हिंग सेवा, स्वच्छता अशा सर्व गोष्टींसाठी ठेकेदार कंपन्यांकडून कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेतले जातात. योगेश राऊत हा गुन्हेगार स्थानिक होता, पण बहुतेकदा या कंपन्यांकडचे हे कर्मचारी बाहेरचेच असतात. त्यांचे नाव, पत्ता, पार्श्वभूमी याची काहीही माहिती कंपनीकडे नसते. त्यातूनच हे प्रकार होत असल्याचे मत आमदार निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.त्या म्हणाल्या, कंपन्यांना सुरक्षेसंबधीचे, विशेषत: महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबधीचे सर्व नियम पाळणे सक्तीचे केले पाहिजे. अशा गोष्टींसाठी सरकारने एखादी स्वतंत्र यंत्रणाही करायला हरकत नाही. तसेच सर्वसाधारण कामांसाठी स्थानिक बेरोजगार युवकांना त्यांची पात्रता पाहून संधी दिली पाहिजे. सर्वांची नजिकच्या पोलिस ठाण्यात सविस्तर माहिती उपलब्ध असली पाहिजे. असे केले तरी बरेच काही साध्य होईल असे मला वाटते. महिलांकडे पाहण्याचा, त्यातही कर्मचारी महिलांकडे पाहण्याचा उनाडक्या करणाऱ्यांचा दृष्टिकोन फारसा चांगला राहिलेला नाही. त्यातच मोबाईलवर सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या अश्लिल साईटस्ही त्यांना अशी कृत्ये करायला प्रवृत्त करतात. दारू प्यायली की मग त्यांना कसले भान रहात नाही.