शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नीरदेवघर धरणग्रस्त आक्रमक

By admin | Updated: November 28, 2015 00:49 IST

धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांची पूर्तता न करता फ क्त ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने आजअखेर संतप्त नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन विकास शेतकरी संघटनेच्या वतीने

भोर : धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांची पूर्तता न करता फ क्त ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने आजअखेर संतप्त नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन विकास शेतकरी संघटनेच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या भाटघर, सांगवी येथील नीरादेवघर धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले.विविध मागण्यांसाठी नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने २६ आॅक्टोबरला धरणावर मोर्चा काढून काम बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी पाटबंधारे विभागाकडून मागण्यांसंर्दभात ५ नोव्हेंबरला पुण्यात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.मात्र ५ नोव्हेंबरला बैठक झालीच नाही. त्यामुळे धरणग्रस्तांनी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. तरीही धरणग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त धरणग्रस्तांनी रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) नीरादेवघर धरणातून खाली सोडलेले पाणी व उजव्या कालव्याचे सुरू असलेले काम बंद केले. तरीही दखल न घेतल्याने आज दुपारी १२ वाजता कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.या वेळी संघटनेचे अध्यक्ष बाळासोा मालुसरे, सचिव नथू दिघे, बापू शिरवले, धोंडिबा मालुसरे, चिमण शिरवले, संतोष शिंदे, राजेंद्र वाडकर, वसंत भेलके, शंकर वेनुपुरे, बाळू वेनुपुरे, लक्ष्मण धामुणसे, बबन मालुसरे, सुभाष मालुसरे, सीताबाई शिरवले, बाळासोा किंद्रे व धरणग्रस्त उपस्थित होते. मागील वीस वर्षांपासून नीरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. धरणग्रस्तांची फसवणूक झाली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबाबत बैठक घेऊन मागण्यांची पूर्तता करावी. मागील सरकारने पुनर्वसनाची कामे सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याला १८ महिने झाले तरी अद्याप काहीच झाले नाही. नवीन सरकारने तर धरणग्रतांना वाऱ्यावर सोडले असून त्यांची पिळवणूक सुरूआहे. (वार्ताहर)नीरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याबाबत वारंवार सूचना देऊनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने धरणग्रस्तांचा संताप अनावर होऊन आता आंदोलन सुरू झाल्यावर अधिकारी बैठक घेण्याचे आश्वासन देत आहेत. जोपर्यंत धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करून ते अधिक तीव्र करण्यात येईल.- संग्राम थोपटे, आमदार, भोर