शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघर, भाटघरमधून विसर्ग

By admin | Updated: March 20, 2016 04:38 IST

धरणग्रस्तांच्या आंदोलनाला न जुमानता पाटबंधारे खात्याने नीरा देवघर धरणातून शुक्रवारी रात्रीपासून ७५० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून शनिवारी सायंकाळी ५.३० पासून ७५० क्युसेक्सने

भोर : धरणग्रस्तांच्या आंदोलनाला न जुमानता पाटबंधारे खात्याने नीरा देवघर धरणातून शुक्रवारी रात्रीपासून ७५० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून शनिवारी सायंकाळी ५.३० पासून ७५० क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. भोर तालुक्यातील नीरा देवघर ३८ टक्के, तर भाटघर धरणात १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून फलटण व बारामती तालुक्यातील शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, नीरा देवघर धरणग्रस्तांच्या मागण्या मंजूर झाल्या नसल्याने धरणग्रस्तांनी काल सकाळी १० वा. धरणावर जाऊन खाली सोडलेले पाणी बंद केले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने रात्री १२ वा. धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे.वीर धरणात सध्या फक्त ७ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने वीर धरणातून बारामती व फलटण तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्याला शेतीसाठी १ एप्रिलपासून पाणी सोडण्यात येणार होते. मात्र, शेतीला कमी पडत असल्याने नीरा देवघर धरणातून काल रात्री ९ वाजता ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले होते. सुमारे १ टक्का पाणी खाली गेले. मात्र, पाणी खाली सोडलेले समजताच शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता नीरा देवघर धरणग्रस्तांच्या कोणत्याच मागण्या शासनाकडून मान्य झाल्या नसल्याने जोपर्यंत धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत धरणातून पाणी खाली जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत धरणग्रस्तांनी धरणातून नीरा नदीत पूर्व भागातील शेतीसाठी सोडलेले पाणी बंद केले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने रात्री १२ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. (वार्ताहर)