शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

प्रातिनिधिक निवड पद्धत हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 01:56 IST

साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत होणारे वाद टाळण्यासाठी प्रातिनिधिक लोकशाही निवड पद्धत अवलंबावी, अशी सूचना ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर यांनी केली.

पुणे : साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत होणारे वाद टाळण्यासाठी प्रातिनिधिक लोकशाही निवड पद्धत अवलंबावी, अशी सूचना ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर यांनी केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एका लेखकाचा आणि प्रकाशकाचा विशेष सन्मान करण्यात येतो. पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या संमेलनात प्रकाशक लेखक डॉ. के. रं. शिरवाडकर सन्मान करण्यात येणार होता. मात्र वयोमानामुळे डॉ. शिरवाडकर सन्मान स्वीकारण्यास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे रविवारी स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार केला. महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर, कवी अरुण शेवते, प्रकाशक दिलीप माजगावकर उपस्थित होते.डॉ. शिरवाडकर म्हणाले, ‘मराठी भाषेचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी दर्जेदार मराठी-इंग्रजी शब्दकोषाची निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात अशोक केळकर यांनी सुरू केलेले कार्य पूर्णत्वास न्यावे.’आयुष्यात संतांना भेटण्याचा जो आनंद मिळतो, तो आनंद शिरवाडकरांना भेटताना झाला. समीक्षक म्हणून त्यांनी मराठी भाषेची मौल्यवान सेवा केली आहे, असे मत स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले.महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी प्रास्ताविक केले. दिलीप माजगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)