शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अहिराणी संवर्धनाच्या प्रयत्नांची गरज

By admin | Updated: April 25, 2016 01:04 IST

अहिराणी भाषा समृद्ध आहे. गावाकडच्या लोकांनी भाषेचा वारसा जपला आहे. खेडेगावात आजही घरोघरी बहिणाबाई आहेत.

पिंपरी : अहिराणी भाषा समृद्ध आहे. गावाकडच्या लोकांनी भाषेचा वारसा जपला आहे. खेडेगावात आजही घरोघरी बहिणाबाई आहेत. अहिराणी भाषा, म्हणी, ओव्या, लग्नातील गाणी, कानबाई-गौराई गीत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत. भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत संमेलनाध्यक्षा डॉ. उषा सावंत यांनी व्यक्त केले.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने एकदिवसीय तिसरे राज्यस्तरीय अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या. प्रारंभी गौराई, साने गुरुजी व बहिणाबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून सुरुवात झाली. भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस नामदेव ढाके, महाराष्ट्र जनसंग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे, मंचाच्या संस्थापक विजया मानमोडे, ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब पिंगळे, निर्माते कैलास वाणी, अभिनेते-लेखक प्रवीण तरडे, योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.मानमोडे म्हणाल्या, ‘‘अहिराणीस राजभाषा म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. खान्देश सांस्कृतिक भवनाची मागणी करणार आहे.’’ पद्मश्री स्व. डॉ. भवरलाल जैन यांना मरणोत्तर ‘अखिल भारतीय खान्देश कोहिनूर’ पुरस्कार, साहित्यिक देविदास हटकर यांना साहित्यरत्न, उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उत्पादनशुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक मोहन वर्दे यांना विशेष सेवा, कुंदन ढाके यांना खान्देशरत्न पुरस्कार, उद्योजक काकासाहेब चौधरी, सुरेश पवार, सुरेश पाटील, दादाभाऊ पाटील, पिंगळे यांना खान्देशभूषण, कैलास वाणी यांना कलारत्न, दीपक पाटील यांना उद्योगरत्न, आमदार उन्मेश पाटील यांना समाजव्रती, गायक शिवदास जोंधळे यांना कलारत्न, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक एम. के. भामरे यांना समाजरत्न, पत्रकार दीपेश सुराणा यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले. लतिका चौधरी यांच्या ‘गल्लीनी भाऊबंदकी’, तसेच ‘आखाजी’ या विशेषांकाचे प्रकाशन केले.(प्रतिनिधी)