शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नऊ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:40 IST

विशेष मुलाला लागणाऱ्या सुविधा व शिक्षक न पुरवता त्याचा मानसिक व भावनात्मक छळ केल्याप्रकरणी सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्तांसह नऊ जणांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.

पुणे : विशेष मुलाला लागणाऱ्या सुविधा व शिक्षक न पुरवता त्याचा मानसिक व भावनात्मक छळ केल्याप्रकरणी सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्तांसह नऊ जणांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी हा आदेश दिला.शाळेचे विश्वस्त संदीप चंद्रप्रकाश गोयंका (वय ५०, मुंबई), अर्चना संदीप गोयंका (वय ४७), शिक्षक मेघा अविनाश दोडेजा (वय ४३), माजी मुख्याध्यापिका शेफाली तिवारी (वय ४४, विमाननगर), रिमा संजय खुराणा (वय ४६, रा. शंकरशेठ रोड), निशा निरंजनकुमार शहा (वय ३२, भवानी पेठ), पूजा भल्ला (वय ४०, कोंढवा), सचिन महादेव चव्हाण (वय २९, घाटेवाडी) व लिनाझ सरोश सोनावाला (रा. कॅशिया बिल्डिंग, झिरकॉन को- आॅप. हाऊसिंग सोसायटी विमाननगर) अशा ९ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. ११ एप्रिल ते २७ सप्टेंबरदरम्यान हा सर्व प्रकार घडला.फिर्यादी यांचा ७ वर्षांचा मुलगा विशेष आहे. त्यांनी प्रवेश घेतेवेळी मुलाबाबत माहिती दिली होती. त्या वेळी शाळेने त्याच्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यासोबतच वेगळे शिक्षक व मानसोपचारतज्ज्ञाचीही मदत घेतली जाते, असे सांगितले. मात्र, मुलाला विशेष सुविधा न देता त्याचा मानसिक व भावनात्मक छळ केला. एक व्यक्ती म्हणून जीवन जगण्याच्या मानमर्यादेच्या अधिकारापासून वंचित केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शिक्षण हक्क कायद्यासह इतर कलमान्वये देखील गुन्हा दाखल केला आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, गुन्ह्याचा तपास होण्याची आवश्यकता असल्याने अतिरिक्त सरकारी वकील एस. एम. जगताप यांनी नऊ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून नऊ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.