शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफकडून बेपत्ता तरुणाचा शोध

By admin | Updated: January 9, 2017 03:05 IST

तळेगाव एमआयडीसीतील जनरल मोटर्स या कंपनीतील कामगार कौस्तुभ कैलास घारे (वय ३० , रा.वराळे ता.मावळ) हा शनिवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता

तळेगाव दाभाडे : तळेगाव एमआयडीसीतील जनरल मोटर्स या कंपनीतील कामगार कौस्तुभ कैलास घारे (वय ३० , रा.वराळे ता.मावळ) हा शनिवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.बेपत्ता घारे यांची दुचाकी (एमएच १४ एफक्यू ९०९४) येथील इंद्रायणी नदीच्या पुलावरील कठड्याला धडकलेल्या स्थितीत आढळली. नदीपात्रात हेल्मेट मिळून आले आहे. त्यामुळे रविवारी दुपार नंतर एनडीआरफच्या दोन तुकड्यातील पंधरा जवान, दोन बोटींसह टीमलीडर भैरवनाथन यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिमेत सहभागी झाले होते.सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इंद्रायणी नदीपात्रात काहीच सुगावा न लागल्याने ही शोधमोहीम थांबविण्यात आली. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक पासलकर, अरविंद हिंगोले, मुगुटराव पाटील व पोलीस कर्मचारी यांनी मदत केली. इंद्रायणी नदीपात्रात एनडीआरफच्या जवानांना गंज लागलेल्या अवस्थेतील एक स्टेनगन सापडली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तळेगाव पोलीस ठाण्यातील हवालदाराकडील गहाळ झालेली ही स्टेनगन असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. इतर सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)