शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत खदखद

By admin | Updated: August 28, 2014 04:09 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मुंबईत घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान पक्षातील खदखद बाहेर आली.

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मुंबईत घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान पक्षातील खदखद बाहेर आली. विशेष म्हणजे प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांच्यासमोर तक्रारी करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना ज्येष्ठ नेत्यांनाही कार्यकर्त्यांनीच धारेवर धरले. पुणे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाल्या. जिल्ह्यातून तब्बल ७६ इच्छुक असल्याने मुलाखतीदरम्यान तणावच निर्माण झाला होता. शिरूर-हवेलीतील इच्छुक मंगलदास बांदल यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी तक्रार केली. दादाच आम्हाला गुंड म्हणत असतील तर लोक काय म्हणणार? असा सवाल बांदल यांनी केला. बांदल यांना अडवू पाहणाऱ्या प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनाही बांदल यांनी फटकारले. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. अन्य इच्छुकांविषयी काही बोलायचे नाही, केवळ आपल्याविषयी बोलायचे, अशा सूचना किंवा अलिखित नियम असल्याने बहुसंख्य इच्छुकांनी आपापलीच माहिती सांगावी, असे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, तरीही खेडमधील काही कार्यकर्ते सभागृहाबाहेर दिलीप मोहिते यांच्या नावाने घोषणा देत होते. या तालुक्यातील मोहितेविरोधकांनी परिवर्तन आघाडी केली आहे. या आघाडीचे सदस्य शरद बुट्टे पाटील, सुरेश गोरे आदींनीही मुलाखती दिल्या. नवनाथ काकडे या इच्छुकाने तर ‘ भाकरी फिरवा’ अशी मागणी केली. खेड व शिरूरमधील मुलाखती एकाच वेळी घेण्यात आल्या. हवेली शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी आपण विद्यमान आमदार असल्याने आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी विनंती केली.इंदापुरात एका बाजूला महाआघाडीच्या माध्यमातून सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात लढण्याची तयारी केली आहे. मात्र, लढायचे कोणी? याबाबतही वाद असल्याचे मुलाखतीदरम्यान उघड झाले. दत्तात्रय भरणे यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रदीप गारटकर, छत्रपती कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकाळ हे देखील मुंबईला गेले होते. मात्र, पक्षाकडे उमेदवारी भरणे यांनीच मागितली. राष्ट्रवादीतच या निमित्ताने दोन गट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गारटकरसमर्थकांनी गारटकर यांच्यावर पक्ष अन्याय करत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.दौंड तालुक्यातील कुल-थोरात गटाच्या वादात कुल गट राष्ट्रवादीतून वेगळा झाल्याचे चित्रही दिसून आले. आमदार रमेश थोरात यांच्याबरोबर आप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, तिघांनीही पक्ष घेईल तो निर्णय मान्य केला जाईल, असे सांगितले. ‘भीमा-पाटस’चे अध्यक्ष राहुल कुल मुलाखतीसाठी गेलेच नाहीत. पुरंदर तालुक्यातून १८ जण मुलाखतीसाठी गेले होते. सर्वांना एकाच वेळी मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. ‘पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणू’ असे या इच्छुकांनी मुलाखतीदरम्यान सांगितले. (वार्ताहर)