शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मंचरला राष्ट्रवादीचे वर्चस्व

By admin | Updated: September 13, 2015 01:35 IST

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून बाजार समितीची सत्ता एकहाती काबीज केली आहे. या निवडणुकीत

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून बाजार समितीची सत्ता एकहाती काबीज केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बाजार समितीतील विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून विजयी मिरवणूक काढली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी आज क्रीडा संकूल येथे झाली. सुरुवाती पासूनच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली ती शेवटपर्यंत राखली. सकाळी साडेदहा वाजता व्यापारी व आडते संघातील मतमोजणी पूर्ण झाली. सोसायटी व ग्रामपंचायत गटातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. हमाल व तोलारी मतदार संघात विलास तुळशीराम गांजाळे व पवन प्रक्रिया संस्था मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १७ जागा जिंकून राष्ट्रवादीने बाजार समितीची सत्ता निर्विवाद राखली आहे. कृषी पतसंस्था सोसायटी गटात सर्वसाधारणमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे देवदत्त जयवंतराव निकम, सखाराम हरिभाऊ काळे, दत्तात्रय रामभाऊ तोत्रे, बाळासाहेब लक्ष्मण बाणखेले, दत्तात्रय शंकर हगवणे, गणपतराव सावळेराम इंदोरे, दत्तात्रय बाळकृष्ण वावरे, महिला प्रतिनिधी मयूरी मारुती शिंगाडे, जायदाबी नंदूभाई मुजावर, इतर मागास प्रवर्ग अशोक भिकाजी ठोके, अनुसूचित जमाती देवू पूनाजी कोकाटे हे विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजीराव संपत निघोट, बाळासाहेब सावळेराम मेंगडे, अनुसूचित जाती-जमाती संजय महादेव शेळके, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्ञानेश्वर जनाजी घोडेकर हे विजयी झाले. व्यापारी व आडते संघातील बाळासाहेब रंगनाथ बाणखेले व सागर बाळशीराम थोरात यांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये राजाराम बाणखेले, माजी उपजिल्हाप्रमुख विजय पवार, वासुदेव भालेराव, गणपत भापकर, जितेंद्र माळुंजे यांचा समावेश आहे. सोसायटी सर्वसाधारण गटात देवदत्त निकम यांना सर्वाधिक ४३८ मते मिळाली आहेत, तर शिवसेनेकडून राजाराम बाणखेले यांना सर्वाधिक २३८ मते मिळाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. आर. माळी यांनी काम पाहिले. सहकार क्षेत्रात राष्टवादी काँगे्रस पक्षाने जनतेसाठी जे काम केले आहे त्या कामाप्रती विश्वास ठेऊन जनतेने विजय मिळवून दिला आहे. असेच काम या पुढेही करत राहू, शेतक-यांना अधिकाअधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करू. बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराच्यावेळी जो विकासाचा आराखडा मांडला होता, तो प्राधान्याने पूर्ण केला जाईल. दिलीप वळसे पाटील, आमदार आंबेगाव तालुका