शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका

By admin | Updated: November 10, 2016 01:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. हा निर्णय सामान्यांच्या दृष्टीने हितकारक आहे. दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर आल्यावर सामान्य जनतेसाठी कल्याणकारी निधी म्हणून तो उपयोगात येणार आहे. भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या काळ्या पैशाच्या बळावर महापालिका निवडणूक लढण्याची तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले.खासदार साबळे म्हणाले, ‘‘गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५वा जयंती महोत्सव असल्याने ‘समता वर्ष ’साजरे केले होते. केंद्र सरकारने हे वर्ष दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दलित कल्याण वर्ष म्हणून जाहीर केले आहे. मोदींनी घेतलेल्या निर्णयामुळे दलित, दीन-दुबळे, उपेक्षित यांच्या कल्याणासाठी चालना मिळणार आहे. मोदी सरकारचे हे ऐतिहासिक पाऊल आहे. स्वातंत्र्योत्तर काळात अन्य कोणत्याही सरकारने असा धाडसी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून वेगळे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे देशातील काळा पैसा व्यवहारात येऊन देशाच्या आर्थिक विकास दरात (जीडीपी) वाढ होईल. अतिरेकी कारवायांना पायबंद बसेल. ‘सब का साथ, सब का विकास’ हे धोरण ठेवून सामान्य नागरिकदेखील विकासाच्या प्रवाहात जोडला जाणार आहे. भाजपाने रीतसर निधी उभारला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार करून मिळविलेल्या काळ्या पैशातून पुन्हा सत्ता मिळवू, असा मस्तवालपणा ज्यांच्यात होता, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निर्णयामुळे पायबंद बसेल, अशी टिप्पणीही साबळे यांनी केली. पत्रकार परिषदेस माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, शहराध्यक्षा शैलजा मोळक, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, प्रमोद निसळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)