शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’च्या टेकावडे विजयी

By admin | Updated: January 12, 2016 04:01 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर पोटनिवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड कायम राखला. सुजाता टेकावडे यांनी शिवसेनेचे विजय गुप्ता यांचा ६३१ मतांनी पराभव केला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर पोटनिवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड कायम राखला. सुजाता टेकावडे यांनी शिवसेनेचे विजय गुप्ता यांचा ६३१ मतांनी पराभव केला. सहानुभूतीच्या बळावर सुजाता टेकावडे या विजयी झाल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला आहे.राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खुनाच्या घटनेनंतर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी काळभोरनगर प्रभागातील पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार रविवारी मतदान झाले. त्यात एकूण ४६ टक्के मतदान झाले होते. एकूण ८४४६ जणांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. आकुर्डीतील हेडगेवार भवनात सकाळी मतमोजणी सुरू झाली. सकाळी अकरापर्यंत निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादीच्या सुजाता टेकावडे, शिवसेनेचे विजय गुप्ता, भाजपाचे गणेश लंगोटे यांच्यात प्रमुख लढत होती. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये शिवसेनेचे गुप्ता आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीअखेर टेकावडे यांना ३४८६ मते, गुप्ता यांना २८५५ मते, लंगोटे यांना २००२ मते मिळाली. मतमोजणीच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीत गुप्ता हे ८१० मतांनी आघाडीवर होते. त्यांना २११० मते मिळाली, तर टेकावडेंना १३०० मते मिळाली होती, तर लंगोटे यांना ५५६ मते मिळाली होती. मतांची ही कमी भरून काढून टेकावडे यांनी अंतिम फेरीत ६३१ मतांची आघाडी घेतली. शिवसेना व भाजपाला शह दिला. १०३ मतदारांनी नोटाचा अधिकार बजावला. खासदार अमर साबळे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपा उमेदवारासाठी आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेना उमेदवारासाठी लक्ष घालूनही उपयोग झाला नाही. टेकावडे यांचे नाव निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी जाहीर केले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर आझम पानसरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका वैशाली काळभोर, शमीम पठाण, नीलेश पांढरकर, प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी टेकवडे यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)काळभोरनगर प्रभागाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात केलेल्या विविध कामांवर जनतेने विश्वास दाखविला. त्यांचा हा विजय आहे. या विजयाने राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.- शकुंतला धराडे, महापौरधनशक्ती विरुद्ध मनशक्तीचा हा विरोध आहे. धनशक्तीला पराजित केले. आमच्याकडे आमदार, खासदार नसताना कार्यकर्ते आणि मतदारबंधंूनी राष्ट्रवादीस कौल दिला. काळभोरनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. मतदान करून अविनाश टेकावडे यांना श्रद्धांजली वाहिली.- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड