शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या दिग्गजांचे राजीनामे

By admin | Updated: February 25, 2017 02:12 IST

पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरभेद्यांनी केलेल्या पक्षविरोधी कामामुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेस भुईसपाट झाली

गराडे : पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरभेद्यांनी केलेल्या पक्षविरोधी कामामुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेस भुईसपाट झाली. निवडणूक लढविलेल्या जिल्हा परिषदेच्या ४ जागा व पंचायत समितीच्या ८ जागांवरील सर्व उमेदवार पराभूत होऊन पक्षाचे पुरते पानिपत झाले. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण व पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष योगेश फडतरे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याची माहिती शिवाजी पोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, शिवाजी पोमण यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे व योगेश फडतरे यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्याकडे आपापल्या पदाचे राजीनामे सादर केले.२००९ व २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पक्षातील काही गद्दार लोक पक्षातच राहून पक्षविरोधी कारवाया करीत विरोधकांना छुप्या किंवा वेळप्रसंगी उघड पद्धतीने सातत्याने मदत करतात. परिणामी पक्षाचे उमेदवार पराभूत होत असून बंडाळी माजत आहे. या गद्दार नेत्यांवर व पदाधिकारी यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे ते निर्ढावलेले आहेत. पक्षाच्या ताकदीवर मोठे झालेले लोकच पक्षाला अडचणीत आणत आहेत. यांची पक्षनेतृत्वाने गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करीत राजीनामे दिले आहेत.(वार्ताहर)