शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

राष्ट्रवादीला भीती बंडखोरीची

By admin | Updated: September 26, 2014 05:38 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वी शहरातील एका कार्यक्रमात इच्छुकांनी कामाला लागा

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वी शहरातील एका कार्यक्रमात इच्छुकांनी कामाला लागा, अशा सूचना शहरातील तीन आणि मावळातील एक अशा चारही मतदार संघातील इच्छुाकांना दिल्या होत्या. त्यामुळे केलेली सूचना खरी ठरली. आघाडीत बिघाडी झाल्याने राष्ट्रवादीने चारही मतदार संघांवर केलेला दावा आज खरा ठरला. शहरातील तीन आमदार राष्ट्रवादीकडून लढतील, असे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे. राष्ट्रवादीची स्बळाची इच्छा पूर्ण झाली असली तरी बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी समोर आहे.आघाडीत बिघाडी झाल्याने राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राष्ट्रवादी संलग्न आणि विद्यमान आमदारांना जागा सोडण्याचे धोरण राष्ट्रवादीचे असल्याने भोसरीचे अपक्ष आमदार विलास लांडे, चिंचवडचे लक्ष्मण जगताप, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित असल्याचे बालेले जात असतानाच रात्री उशीरा जगताप आणि लांडे यांनी भाजपात प्रवेश केल्याचा एसएमएस व्हॉर्टअ‍ॅपवरून फिरला. आमदार लांडे कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता कायम होती.उपमुख्यमंत्र्यांची स्वबळाची इच्छा पूर्ण झाली असली तरी अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे जगताप यांनी भाजपात प्रवेश केल्याने उमेदवाराचा शोध राष्ट्रवादीला घ्यावा लागणार आहे. चिंचवडमधून माजी महापौर संजोग वाघेरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, विलास नांदगुडे, युवक अध्यक्ष मयूर कलाटे यांचे नाव पुढे येऊ येते. पिंपरीतून विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव पुढे येऊ शकते. भोसरीतून स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे, राष्ट्रवादीच्या सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, शहराध्यक्ष योगेश बहल,माजी शहराध्यक्ष नाना लोंढे, नगरसेवक दत्ता साने यांचे नाव पुढे येऊ शकते. इच्छुकांची संख्या राष्ट्रवादीत अधिक असली तरी बंडखोरीचे मोठे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. राष्ट्रवादीतील आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्याची मोठी डोकेदुखी या पक्षासमोर आहे.(प्रतिनिधी)