शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘भीमाशंकर’ची सत्ता राष्ट्रवादीने राखली

By admin | Updated: June 9, 2015 05:23 IST

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भीमाशंकर सहकार पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या आहेत.

मंचर : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भीमाशंकर सहकार पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना पुरस्कृत श्री भीमाशंकर शेतकरी सहकार पॅनलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव-पाटील, कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराव ढोबळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांना पराभव स्वीकारावा लागला. कारखान्याचे संचालक माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे भीमाशंकर कारखान्यातील एकहाती निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.पाच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १६ जागांसाठी निवडणूक झाली. राष्ट्रवादी पुरस्कृत भीमाशंकर सहकार पॅनलने १६ जागांवर, तर शिवसेना पुरस्कृत श्री भीमाशंकर शेतकरी सहकार पॅनलने १२ जागांवर उमेदवार उभे केले. या जागांसाठी ६६ टक्के मतदान झाले होते. सकाळी ८ वाजता मंचर येथील क्रीडा संकुलाच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली.सर्वप्रथम भटक्या विमुक्त जाती व जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भीमाशंकर सहकार पॅनलचे रमेश हरिभाऊ लबडे विजयी झाले. त्यांना ५,७७६ मते मिळाली. शिवसेना पुरस्कृत भीमाशंकर शेतकरी सहकार पॅनलचे गणेश पंडित यांना १५९० मते मिळाली. त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटाचा निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे रमेश यशवंत कानडे ५७८४ मते मिळून विजयी झाले. रांजणी-शिंगवे या गटाकडे सर्वांचे लक्ष होते. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव चिमणराव खालकर हे अपक्ष उभे होते. मात्र, त्यांचा कुठलाही परिणाम राष्ट्रवादीच्या उमेदवारावर झाला नाही. खालकर यांना ११५० मते मिळाली. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत बाबासाहेब धोेंडिबा खालकर ५४१० मते, कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष देवदत्त जयवंतराव निकम ५६५८ मते, दादाभाऊ बजाबा पोखरकर ५५६५ मते हे विजयी झाले. या गटातील शिवसेना पुरस्कृत पॅनलचे एकमेव उमेदवार साहेब दगडुजी थोरात यांना १५५४ मते मिळूून ते पराभूत झाले. एकूण १९ हजार ७७४ मतदान झाले. त्यापैकी ४३७ मते बाद झाली.दरम्यान, शेवटच्या निकाल सव्वासहा वाजता जाहीर झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर येऊन जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत कल्याण पांढरे यांनी, तर सहायक म्हणून तहसीलदार बी. जे. गोरे यांनी काम पाहिले. कल्पनाताई आढळराव-पाटील यांना धक्कामहिला राखीव गटात खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या पत्नी कल्पनाताई यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांना केवळ १९५७ मते मिळाली आहेत. शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या मीना गावडे (१४१९ मते) याही पराभूत झाल्या. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलच्या कल्पना गाढवे ५४३० मते व मंदाकिनी संपतराव हांडे ५३५० मते मिळवून विजयी झाल्या. दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य चार हजारांहून अधिक मतांचे अंतर होते. कल्पनाताई पाटील यांच्या पराभवामुळे सर्व निकाल एकतर्फी लागणार हे निश्चित झाले़ (वार्ताहर)------केलेल्या कामाची पावतीसाखर कारखान्याच्या माध्यमातून गेली १५ वर्षे शेतकऱ्यांसाठी केलेले कामाची पावती मतदारांनी देऊन आम्हाला मोठ्या मताच्या अंतराने विजयी केले. विरोधकांनी निवडणूक लादल्याचे मतदारांनी आजच्या मतदानावरून सिद्ध केले आहे़ यापुढेही असेच जोमाने काम करून दाखवू़ - दिलीप वळसे पाटील,संस्थापक व आमदार ---------कुकरची शिट्टी वाजलीच नाहीराष्ट्रवादीच्या उमेदवारांना कपबशी, तर शिवसेनेच्या उमेदवारांना कुकर चिन्ह मिळाले होते. एकमेव अपक्ष उमेदवार वसंतराव खालकर यांना बादली चिन्ह मिळाले. मतदानाच्या दिवशी कपबशी चालणार की कुकरची शिट्टी वाजणार, ही चर्चा पारावर सुरू होती. निकाल एकतर्फी लागला तेव्हा ‘कुकरची शिट्टी वाजलीच नाही...’ अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.