शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी आघाडीवर, काँग्रेस पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2015 00:44 IST

वेल्हे तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर आघाडी घेतली आहे

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर आघाडी घेतली आहे, तर काँग्रेस पिछाडीवर गेली आहे.वेल्हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप लोहकरे यांच्या ओसाडेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने बाजी मारली आहे. अंत्रोली येथील काँग्रेसचे युवक अध्यक्ष नाना राऊत यांचा पॅनल पराभूत झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष किरण राऊत यांचा पॅनल विजयी झाला.जिल्हा परिषद सदस्या वसुधा अमोल नलावडे यांच्या निगडेमोसे गावात देखील काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला असून, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. विंझर ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत मनसेने मुसंडी मारली आहे. माजी पंचायत समिती सदस्य संतोषअप्पा दसवडकर यांचे बंधू अण्णा दसवडकर यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. वेल्हे तालुक्याच्या राजकारणाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे कलाटणी मिळाली आहे. तालुक्यातील प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जोर लावला होता. पण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.ओसाडे ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप लोहकरे यांना आपल्या गावातच पॅनलच्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वेल्हे तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रमोद लोहकरे यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या अंत्रोलीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे तालुकाध्यक्ष किरण राऊत यांच्या पॅनलने बाजी मारली असून, तालुका काँग्रेसचे युवक अध्यक्ष नाना राऊत पॅनलचा पराभव झाला आहे. वेल्हे पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता असून, जिल्हा परिषद सदस्या वसुधा अमोल नलावडे यांच्या निगडेमोसे गावात देखील काँग्रेसला घरचा आहेर मिळाला आहे. या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रेवणनाथ दारवटकर यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. विंझर ग्रामपंचायतीमध्ये वर्षानुवर्षे काँग्रेसची सत्ता मोडीत काढत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच उमेदवार निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षांची काँग्रेसची परंपरा मोडीत काढली आहे. मालवली ग्रामपंचायतीमध्ये देखील काँग्रेसची सत्ता मोडीत काढली असून, या ठिकाणी मंगेश कोडीतकर, बापू जाधव यांनी बाजी मारली आहे. तर हिरपोडी, लाशिरगाव आणि मालवली येथील ग्रामपंचायतीवर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेवणनाथ दारवटकर ग्रुपने बाजी मारली आहे.तर मार्गासनी ग्रामपंचायतीमध्ये देखील प्रस्थापितांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता मोडीत काढली आहे. रुळे ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने बाजी मारली असून, या ठिकाणी राष्ट्रवादीला हार मानावी लागली आहे.