शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:12 IST

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या ४० ग्रामपंचायती व २ ...

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या ४० ग्रामपंचायती व २ संमिश्र वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अखंड सुरू असलेल्या विकास कामावर तालुक्यातील तमाम जनतेचा विश्वास असल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमय इंदापूर तालुका झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सर्वसामान्य जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारसरणीतून इंदापूर तालुक्यामध्ये कामकाज सुरू आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून झोपडीतील माणसाचा विकास व न्याय देण्याची भूमिका सातत्याने असल्यामुळे, प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या विविध योजनेचा निधी पोहोचलेला असून विकास पोचला आहे. इंदापूर तालुक्यातील विरोधक हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी, इतक्या ग्रामपंचायती आमच्या विचाराच्या आल्या. आशा चुकीच्या बातम्या पसरवू लागले आहेत. परंतु ज्या ६० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, यामध्ये तब्बल ४० ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व झाले आहे. तर दोन ग्रामपंचायती संमिश्र आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या विकासासाठी कटिबद्ध असून गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, वीज या मूलभूत सुविधा प्रत्येक गावाला दिल्या जातील. त्यामुळे तालुक्यातील कोणताही नागरिक, विरोधकांच्या भूलथापांना कधीही फसत नाही, असाही विश्वास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे सातत्याने लक्ष इंदापूर तालुक्यावर असल्यामुळे तालुका पुणे जिल्ह्यामध्ये विकास कामात पुढे राहिला आहे. दळणवळणासाठी महत्त्वाचे समजले जाणारे रस्ते अद्यावत होत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचा उपेक्षित असलेल्या पाणीप्रश्न मार्गी लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून मिळणारे पाणी जास्तीचे मिळणार आहे, हा चाललेला विकासाचा महापूर विरोधकांना देखवत नाही, अशी टीका राज्यमंत्री भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.

मी कधीही खोटे बोलत नाही.जे बोलायचे ते विकास कामातून बोलून दाखवतो. मात्र विरोधकांना काहीच हातात काम नसल्यामुळे, खोटे बोलून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न अक्षरश: नुकत्याच झालेल्या इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नागरिकांनी नाकारला आहे, अशीही टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

(राज्यमंत्री दत्तात्रय भरणे