शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

By admin | Updated: February 24, 2017 02:32 IST

मुळशी पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर

पौड : मुळशी पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले, तर जि.प.गटात तीन पैकी १ जागा सेनेकडे, तर २ जागा राष्ट्रवादीकडे राहिल्या आहेत. कासार आंबोली येथील सैनिकी शाळेत सकाळी बरोबर १० वाजता एकूण २८ टेबलवर सर्व गट गणाची एकाचवेळी सुरूझालेली मतमोजणी बरोबर ११.३० वाजता संपली.२०१२ च्या निवडणुकीत पंचायत समितीत सहा पैकी ५ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार, तर १ जागा काँग्रेस पक्षाकडे होती व जि.प. ३ गटांपैकी २ जागा राष्ट्रवादी, तर १ जागा सेनेकडे होती. या वेळी शिवसेनेने पंचायत समितीत मुसंडी मारत १ जागा अधिक घेतली, तर जि.प.गटात १ जागा कायम ठेऊन आपला आलेख उंचावता ठेवला.पौड-कासार-आंबोली गटात अनुसूचित जमातीचा शिवसेनेचा सर्वांत तरुण उमेदवार असलेला सागर काटकर याने सुरवातीपासून आघाडी घेत आपल्या विजयाचा मार्ग सुकर केला. तर त्यापाठोपाठ बावधन -पिरंगुट गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शारदा ननावरे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली, परंतु अंतिम निकालात राष्ट्रवादीच्या अंजली कांबळे यांनी २१० मतांची आघाडी घेत बाजी मारली.विशेष म्हणजे सुरवातीला शिवसेनेच्या शारदा ननावरे याच विजयी झाल्याचे सर्वत्र कळाले व बाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम निकालात अंजली कांबळे यांना विजयी घोषित केल्याने या आकस्मिक निकालाने तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पिरंगुट गणात आजी-माजी सभापतींच्या सौभाग्यवतींच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या राधिका कोंढरे यांनी विजयश्री संपादन केली. भाजपा, मनसे व अपक्षांना आपले खातेही खोलता आले नाही. (वार्ताहर) माण- हिंजवडी गटात राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांनी आपल्याबरोबर माण व हिंजवडी गणाच्या दोन्ही जागा खेचून आणत काँग्रेस व सेनेला धक्का दिला. या निकालाने मुळशीत मतदारांनी राष्ट्रवादीने मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना, तर सेनेने मागील वर्षभरात केलेल्या संघटनात्मक बांधणीला कौल दिल्याचे स्पष्ट झाले.मुळशीत मागील निवडणुकीत भाजपाचे तालुक्यात कोणतेही अस्तित्व नसताना या वेळी भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिली, तर माण गट वगळता काँग्रेस सर्व ठिकाणी पिछाडीवर राहिली आहे. या वेळी सर्वच पक्षांनी उमेदवार देताना घातलेल्या गोंधळामुळे आपल्याला अपेक्षित उमेदवार न मिळाल्याने तालुक्यातील तीन गटांत १३२०, तर सहा गणांत १०२३ अशा एकूण २३४३ मतदारांनी नोटा बटणाचा वापर केला.विजयी झालेल्या उमेदवारांनी आपल्या गावी मिरवणुका काढून जल्लोष केला.