शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट झाला नसताना दुस-यांदा बोहल्यावर चढणा-या नवरोबाला सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST

पुणे : पहिला घटस्फोट झाला नसतानाही गुपचूप दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या नवरोबाला न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये ...

पुणे : पहिला घटस्फोट झाला नसतानाही गुपचूप दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या नवरोबाला न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या पतीने आपले पहिल्या पत्नीबरोबर लग्नच झाले नसल्याचा बचाव न्यायालयात केला होता.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पद्याकर जोंधळे यांनी हा निकाल दिला आहे. दुसरे लग्न करण्यापूर्वी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी दोघांनी संमतीने दावा दाखल केला होता. या दोघांचा नोव्हेबर २००१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही महिन्याने पतीने पत्नीला विविध कारणावरुन त्रास देण्यास सुरुवात केली. वाद मिटत नसल्याने त्यांनी एप्रिल २००५ मध्ये कौटुंबिक न्यायालयात संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. मात्र, या दाव्याचा निकाल होण्यापूर्वीच पतीने जुलै २००५ मध्ये दुसऱ्या तरुणीबरोबर विवाह केला. पहिली पत्नी जिवंत असतानाही दुसरे लग्न केल्याने पती व दुसऱ्या पत्नीविरुद्ध पहिल्या पत्नीने अ‍ॅड. मानसी जोशी यांच्यामार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदार खटला दाखल केला. तसेच आपण कायदेशीर पत्नी असून आपल्याला पोटगी मिळावी असा अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना दरमहा ३ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिले होते.

दुस-या पत्नीशी आपण त्याअगोदरच १९९९ मध्ये लग्न केले असल्याचा दावा करून पतीने विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, त्याचे योग्य कायदेशीर पुरावे पतीला सादर करता आले नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली तारीख ही लग्नाच्या तारखेबाबतचा निर्णायक पुरावा होऊ शकत नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने काढून पतीला शिक्षा सुनावली.