शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
4
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
5
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
6
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
7
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
8
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
9
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
10
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
11
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
12
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
13
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
14
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
15
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
16
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
17
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
18
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
19
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
20
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?

नवले पूल बनलाय ‘मौत का कुआँ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 03:09 IST

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष; सिग्नल यंत्रणा नाइलाजास्तव बंद

- कल्याणराव आवताडे नऱ्हे : येथील नवले पुलाखाली असलेल्या सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले, मात्र उद्घाटनानंतर तीन-चार दिवसांतच ही सिग्नल यंत्रणा बंद ठेवावी लागली.नवले पुलाखाली वारंवार वाहतूककोंडी होते तसेच येथे अपघातही बऱ्याच वेळेला घडत असतात आणि ह्यात बºयाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांच्या मागणीवरून अखेर येथे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात महिला व बालकल्याण सभापती राजश्री नवले यांच्या निधीतून सिग्नलही बसविण्यात आले.मात्र सिग्नल बसविल्यानंतर तीन-चार दिवसांतच सिग्नल बसविण्या अगोदरपेक्षाही जास्त वाहतूककोंडी होत असल्याने नाइलाजस्तव वाहतूक पोलिसांनी सिग्नल बंद ठेवून वाहतूक पोलीस स्वत: वाहतूककोंडी टाळण्यासाठी गर्दीच्या वेळी सकाळी व संध्याकाळी स्वत: उभे राहून वाहतूक नियोजन करत आहेत. यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपयुक्त तेजस्वी सातपुते यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला उपाययोजना सुचवून त्या पूर्तता करण्याबाबतचे पत्र दिले आहे, यामध्ये नवले पुलाखालून नºहे गावाकडे जाणारा पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता हा सिंगल असून येणारे व जाणारे वाहनासाठी तो रस्ता पुरेसा नाही. नºहे गावातून आलेली वाहने ही पुलाखाली सिग्नलला थांबल्यानंतर वाहनांना रस्ता जाण्यासाठी शिल्लक राहत नाही. तसेच कात्रज बायपासकडून येणाºया वाहनांना नवले पूल गर्दीच्या वेळी अपुरा पडतो.उपाययोजनांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?दोनच दिवसांपूर्वी मुंबईकडून मांढरदेवीकडे निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात याच ठिकाणावर झाला. यात८ भाविक गंभीर जखमी झाले. नवीन कात्रज बोगदा ते वडगाव पुलादरम्यान महामार्गावर तीव्र उतार असून त्यासाठी तिथे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ५० अथवा १०० फुटापर्यंत पांढरे पट्टे करण्याच्या उपाययोजनाही सुचविल्या होत्या, तशा उपाययोजनांचे पत्रही सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिले आहे, मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सुचविलेल्या उपाययोजनांकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.ठळक मुद्देसिग्नल असून अडचण नसून खोळंबाजाणाºया - येणाºया वाहनांसाठी पुरेसा सर्व्हिस रस्ता नसल्याने वाहतूककोंडीसिग्नल चालू ठेवल्यास अधिकच वाहतूककोंडीनाईलाजास्तव वाहतूक पोलिसांनी सिग्नल यंत्रणा बंद ठेवली आहे.वाहतूक पोलीस कर्मचाºयांवर वाहतूक नियमन करण्याचा ताण वाढतो आहे.नवले पुलाखाली ३ वाहतूक पोलीस, १ वॉर्डन आणि१ अधिकारी वाहतूक नियमनासाठी.राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून आम्हाला तशा प्रकारे सूचना मिळाल्या असून येत्या १० दिवसांत नवले पुलाखालील सर्व्हिस रस्त्याच्या साईड पट्ट्या भरून घेतल्या जातील.- बी. के. सिंग,प्रमुख, रिलायन्स इन्फ्राआम्ही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे लेखी मागणी केली असून, त्याचबरोबर प्रत्यक्षातही आम्ही याबाबत पाठपुरावा करत आहोत. मात्र अजून कामास सुरुवात झाली नाही.- राजेंद्र काळेवाहतूक पोलीस निरीक्षकनवले पुलाखाली सर्व्हिस रस्त्याच्या साईडपट्ट्या भरून घेण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारास सूचना दिल्या आहेत. सूचना देऊनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही.- भीमराव तापकीर, आमदारवाहतूक पोलीस उपायुक्त यांचे पत्र मिळाले असून संबंधित काम हे रिलायन्स इन्फ्राकडे असून त्यांना त्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत.- सोहन निकम, कार्यकारी अभियंताराष्ट्रीय महामार्ग प्रशासननवले पुलाखाली होणारी वाहतूककोंडी आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतूक पोलिसांची होणारी धावपळ पाहता प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.- अतुल हेलोंडे, नागरिक

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा