शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘एचए’ कंपनीला नवसंजीवनी

By admin | Updated: December 22, 2016 02:15 IST

येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीला पुनरुज्जीवनाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कंपनीच्या मालकीची

पिंपरी : येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीला पुनरुज्जीवनाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कंपनीच्या मालकीची शहरात मोक्याच्या ठिकाणची ८७ एकर जागा विक्री करून त्यातून कपंनीचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. कंपनीची आर्थिक देणी देण्याबरोबर कामगारांचे दोन वर्षांचे थकीत वेतन दिले जाणार आहे. कंपनीला नवसंजीवनी मिळावी, याकरिता १०० कोटींचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिला जाणार आहे.पिंपरी-चिंचवड परिसरातील एचए कंपनी १९९७ ला आजारी उद्योग म्हणून जाहीर केली. आर्थिक संकटात सापडल्याने कंपनी डबघाईला आली. उत्पादन प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाला. २००६ मध्ये कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय रसायनमंत्री रामविलास पासवान यांच्या काळात केंद्र शासनाने १३२ कोटींचे पुनर्वसन पॅकेज मंजूर केले होते. त्यानंतर कंपनीची स्थिती काही अंशी सुधारली होती. त्या वेळी कंपनीची जागा विक्री करून निधी उभारण्याचा पर्याय पुढे आला होता. मात्र, कंपनीची जागा विक्री करण्यास कामगारांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे कंपनीची जागाविक्रीचे प्रस्ताव बारगळले. कालांतराने पुन्हा कंपनी अडचणीत आली. कर्जाचा डोंगर वाढत गेला असून, कामगारांचे २४ महिन्यांचे वेतन थकले आहे. आघाडी सरकारच्या कालखंडात एचए मजदूर संघाचे अध्यक्ष, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी तसेच भाजपा शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे यांनीही केंद्रीय रसायनमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे कंपनी वाचविण्यासाठी मागणी केली होती. पुन्हा एकदा कंपनीला पुनर्वसन पॅकेज देण्याच्या मागणीचा रेटा वाढला होता. तसेच वेतन वेळेवर मिळत नसल्याने आणि पुनवर्सन होत नसल्याने कामगारांनी आंदोलनही केले होते. एचए कंपनीला पुनरुज्जीवन मिळण्यासंदर्भात निर्णय झाला. यासंदर्भात खासदार साबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तर बारणे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली. एचए कंपनीला पुनरुज्जीवन मिळण्याचा निर्णय झाल्याने कामगारांना थकीत वेतन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)