शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगाव ग्रामपंचायत अडचणीत

By admin | Updated: November 28, 2015 00:48 IST

नारायणगाव येथील शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेतल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत ही कारवाई करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही

पुणे : नारायणगाव येथील शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेतल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत ही कारवाई करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता हे प्रकरण ग्रामपंचायतीच्या चांगलेच अंगलट येणार आहे.नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काही गावगुंडांना हाताशी धरून नारायणगाव-जुन्नर रोडवरील एका गाळ्याचा ताबा मिळविण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईच्याविरोधात गाळेधारकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखल्याने गाळेधारकाचा जीव वाचला.जाधव या गाळेधारकाने दिलेल्या फिर्यादीनुसार भा़ द़ं वि़ कलम ४५२, ४४८, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे ग्रामपंचायत व बाहेरील गुंडांविरुद्घ १८ आरोपींविरुद्घ गुन्हा नोंद केला होता़ पोलिसांनी पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, नारायणगाव ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून ग्रामपंचायतीला अशी कारवाई करण्याचे अधिकार आहेत किंवा नाही, याची लेखी माहिती मागितली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पोलिसांनी दिलेल्या पत्रात सदरची बाब ही सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने गंभीर असून भविष्यात यातून मोठा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे, असे कळविले होते. या पत्राची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईची चौकशी करा व दोन दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश काढले आहेत. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी यशवंत शितोळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी नितीन माने यांनी गुरुवारी ग्रामपंचायतीत जाऊन चौकशी केली. त्यांनी ग्रामपंचायतीची पाहणी व तपासणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या अहवालात ग्रामपंचायतीच्या हद्दीतून राज्यमार्ग १११ चा काही भाग गेलेला आहे. रस्त्याच्या बाजूला ६१ गाळे बांधण्यात आले आहेत. ते १९८९ पासून अस्तित्वात असून सुरुवातीला मोकळ््या जागेत लोक व्यवसाय करीत होते. नंतर शटरचे दरवाजे असलेले पत्र्याचे गाळे लोकांनी बांधले. मुळात हे गाळे बांधलेली जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत. ग्रामपंचायतीने २०११ मध्ये मालकीसाठी प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ते ताब्यात नसताना ग्रामपंचायतीला कारवाईचा अधिकार उरत नाही. त्यामुळे त्यांनी केलेली कारवाई बेकायदेशीर ठरू शकते. (वार्ताहर)