शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कॉल सेंटरच्या तरुणीवर बलात्कार करणारा नराधम गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:13 IST

पुणे : खराडी परिसरातील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास विश्रांतवाडी पोलिसांनी ३६ तासात गजाआड ...

पुणे : खराडी परिसरातील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास विश्रांतवाडी पोलिसांनी ३६ तासात गजाआड करण्यात यश मिळवले. खराडी येथे राहणारा हा २४ वर्षाचा तरुण आहे.

पिडीत तरुणीने खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास ती दुचाकीवरून धानोरीला घरी निघाली होती. दरम्यान ती घरी जात असताना तिचा आरोपीने पाठलाग सुरू केला. काही वेळानंतर तिला टिंगरेनगर परिसरात अडविले. त्यानंतर तिला मारहाण करून जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवर बसविले. तरुणीला खराडी परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी आरोपी घेऊन गेला. त्या ठिकाणी तरुणीवर त्याने बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला गुंजन चौक परिसरात आणून सोडले. आरोपीच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर पीडित तरुणीने मित्राला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

आरोपीला फिर्यादी ओळखत नव्हती. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे काम जिकीरीचे होते. या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही तपासणीसाठी एका पथकाची नेमणूक केली. त्यातून काही ठिकाणी या तरुणीला घेऊन जाताना दिसून आला. त्यावरुन पोलिसांनी या नराधमाचा शोध घेऊन त्याला शनिवारी पहाटे अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम अधिक तपास करीत आहेत.