शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुणो मेट्रोचे अखेर नामकरण

By admin | Updated: October 29, 2014 00:19 IST

शहरातील वाहतूकसमस्या सोडविण्यासाठी मैलाचा दगड ठरणा:या मेट्रो प्रकल्पासाठीच्या कंपनीचे अखेर नामकरण झाले असून,

पुणो :  शहरातील वाहतूकसमस्या सोडविण्यासाठी मैलाचा दगड ठरणा:या  मेट्रो प्रकल्पासाठीच्या कंपनीचे अखेर नामकरण झाले असून,  ‘पुणो महानगर मेट्रो रेल कॉपोर्रेशन’ या नावाने या कंपनीची नोंदणी असणार आहे.  दरम्यान,  राज्य आणि केंद्र सरकारकडून संचालकांची नियुक्ती झाल्यावर कंपनी कार्यान्वीत होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  तसेच, या कंपनीच्या माध्यमातूनच मेट्रोसाठी जागतिक निविदा मागविण्यात येणार असून, या कंपनीमुळे मेट्रोच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले असल्याची माहिती अधिकृत सूत्रंनी दिली. 
  शहरात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते निगडी या दोन मार्गावर राबविल्या जाणा:या या प्रकल्पासाठी निविदेचा आराखडा तयार करणो, जागतिक निविदा मागविणो, ही प्रक्रिया राबविण्याची ही जबाबदारी या कंपनीवर असणार आहे. पालिकेचा त्यात केवळ समन्वयाचा सहभाग असेल. या कंपनीवर राज्य सरकार पूर्ण वेळ संचालक नियुक्त करणार असून, अन्य विभागांच्या पाच-सहा संचालकांची नियुक्ती करणार आहे. तसेच, केंद्र सरकारही चार-पाच अधिका:यांची नियुक्ती करणार आहे. मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाने औपचारिक मंजुरी दिल्यावर संचालकांची नियुक्ती अपेक्षित आहे. संचालक नियुक्ती झाल्यावर कंपनी कायद्यान्वये त्यांची नोंदणी होऊन मेट्रोला कंपनी म्हणून भाग भांडवल उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर निविदा तयार करण्यासाठी कंपनी तज्ज्ञ संचालक नियुक्त करून जागतिक निविदा मागविण्यात येणार आहे. दरम्यान, मेट्रोच्या मान्यतेसाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी दिल्ली येथे प्री. पीआयबीसमोर सादरीकरण केले असून, कंपनी स्थापनेच्या हालचालीमुळे प्रकल्पास आणखी गती मिळाली असल्याचे सूत्रंनी सांगितले. तसेच कंपनी स्थापन करून तिच्या नोंदणीचीही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मंजुरी मिळाल्यावर कंपनीची नोंदणी होणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले.