शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गावांच्या नावानुसार प्रभागांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 01:12 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३२ प्रभाग असणार आहेत. या प्रभागाची नावे ही प्रचलित गावांच्या नावानुसार असणार असून

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३२ प्रभाग असणार आहेत. या प्रभागाची नावे ही प्रचलित गावांच्या नावानुसार असणार असून, नावाचे वाद टाळण्यासाठी प्रभागांना क्रमांक द्यावेत, अशीही सूचना करण्यात आली आहे. प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तीन सदस्यीय समितीला सादर केला आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७ला होणार असून, निवडणूक कार्यक्रम, प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. बहुसदस्यीय चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी ३२ प्रभागांचा प्रारूप आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वाक्षरीने निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी प्रभाग प्रारूप आराखडा बुधवारी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे सोपविला. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची त्रिसदस्यीय समिती आरक्षण तपासणी करून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव १२ सप्टेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहे. चाचणी अयशस्वीमहापालिका प्रभागरचनेबाबत या वेळी गुगल अर्थचा वापर करून आराखडा तयार करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने सूचित केले होते. प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी नव्या करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगामार्फत सॉफ्टवेअर पुरविण्यात येणार होते. मात्र, हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकांकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणेच्या आधारे नव्या प्रभागांची मांडणी करण्यात आली. प्रभाग रचनेची प्रक्रिया गुगल मॅप, प्रगणक गट, महाआॅनलाइनच्या संगणकीय प्रणालीचा आधार घेऊन केली आहे. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पारदर्शकपणे करण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात हे काम महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनीच केले. त्यांच्यावरही राजकीय दबाव टाकण्यात आल्याचे काहींनी अनौपचारिकरीत्या बोलताना सांगितले. महापालिकेत प्रभागरचनेची चर्चाप्रारूप प्रभागरचनेचे काम सुरू झाल्याने महापालिकेत प्रारूप प्रभागरचनेची चर्चा आहे. आपला प्रभाग कसा आहे, याबाबत नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे निवडणूक विभागात येऊन कार्यकर्ते प्रभाग रचना झाली आहे का, याबाबतची माहिती घेत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)