शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

नगररचनाकार सहसंचालक नाझीरकरांसह तिघांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: June 30, 2017 03:38 IST

अमरावती येथील सहसंचालक नगररचनाकार हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रथमवर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अमरावती येथील सहसंचालक नगररचनाकार हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी दिला. पूर्वी भागीदार असलेल्या कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट कागदपत्रांच्या साह्याने जवळपास १८० दुचाकींची विक्री केल्याचा आरोप अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.सहसंचालक नगररचना हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय ५३), त्यांची पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर (वय ४२, दोघेही रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड) आणि नवनाथ आॅटोमोबाईल कंपनीचे भागीदार प्रवीण सोरटे (३०, रा. सिंहगड रोड, पर्वती) यांच्याविरुद्ध न्यायालयाने भादंवि कलम ४०३, ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४६९, १२० ब आणि ३४ नुसार तपास करण्याचे आदेश दत्तवाडी पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी ओम साई आॅटोमोबाईलचे भागीदार नितीन साहेबराव पाटील (रा. कर्वेनगर) यांनी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती.पाटील यांचा व्यवसाय असून ओम साई आॅटोमोबाईल्स नावाची त्यांची एजन्सी आहे. या एजन्सीद्वारे ते वाहनांची विक्री करतात. पाटील यांच्याकडे एका प्रख्यात दुचाकी कंपनीची डीलरशिप आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पाटील यांची हनुमंत नाझीरकर यांच्याशी ओळख झाली. नाझीरकरांनी त्यांना आॅटोमोबाईल शोरूममध्ये भागीदारी करण्याची विनंती केली. गुंतवणुकीसाठी पैसे नसल्याने पाटील यांनी मालमत्ता तसेच सोलापूर रस्त्यावरील ट्रॅक्टरचे शोरूम गहाण ठेवले. नाझीरकर स्वत: शासकीय नोकरीमध्ये असल्याने त्यांनी पत्नीला पाटील यांची भागीदर बनविले.मात्र, नाझीरकर यांच्याकडून आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता ठेवली जात नसल्याने त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. या वादामधून मार्च २०१६मध्ये भागीदारी तोडण्यात आली, तेव्हा नाझीरकर यांना पाटील यांनी ६८ लाख रुपये दिले. भागीदारी संपुष्टात आल्यानंतर ओम साई आॅटोमोबाईलचे हक्क पाटील यांच्याकडेच अबाधित राहीले. दरम्यान, नाझीरकर आणि प्रवीण सोरटे यांनी नवनाथ आॅटोमोबाईल्स कंपनी स्थापन केली. मात्र, त्यांनी त्या वेळी आरटीओकडून टे्रड सर्टिफिकेट न घेता ओम साई आॅटोमोबाईल कंपनीच्या टे्रड सर्टिफिकेट तसेच सेल्स लेटरचा वापर करून १८० वाहनांची ग्राहकांना विक्री केली. नाझीरकर आणि सोरटे यांनी ओम साई आॅटोमोबाईलचे टे्रड सर्टिफिकेट आरटीओमधून त्यांच्या संमतीशिवाय बेकायदेशीरपणे नूतनीकरण करून घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या वाहनांवर लागणारा कर पाटील यांना भरावा लागणार आहे. या सर्व गैरप्रकारामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी सामील असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यांच्या सहभागाशिवाय चुकीच्या पद्धतीने झालेली वाहनांची नोंदणी आणि विक्री होऊच शकली नसती, असे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देण्यात आली. मात्र, कोणीही त्यांची तक्रार घेतली नाही. कोठेही दाद न मिळाल्याने शिवाजीनगर न्यायालयात धाव घेऊन त्यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे अ‍ॅड. श्रीवास्तव यांनी सांगितले.