शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

माझं पुणं क्रीडाक्षेत्रातही स्मार्ट व्हावं - चंदू बोर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 02:36 IST

आपल्या शहरासोबतच वाढण्याचं भाग्य मला लाभलं. मोठा भाऊ बेंजामिनच्या मागे-मागे यंग मेन्स ख्रिश्चन्स असोसिएशन, अर्थात वायएमसीएच्या मैदानावर जाणारं लहान पोर ते वयाच्या ८३व्या वर्षापर्यंत आयुष्याच्या विविध टप्प्यांप्रमाणे या शहराची वाटचाल मी जवळून बघत आहे. काळाच्या गरजेनुसार माझ्या पुण्यात अनेक बरेवाईट बदल झाले असले, तरी मी या शहराच्या आकंठ प्रेमात आहे.

आपल्या शहरासोबतच वाढण्याचं भाग्य मला लाभलं. मोठा भाऊ बेंजामिनच्या मागे-मागे यंग मेन्स ख्रिश्चन्स असोसिएशन, अर्थात वायएमसीएच्या मैदानावर जाणारं लहान पोर ते वयाच्या ८३व्या वर्षापर्यंत आयुष्याच्या विविध टप्प्यांप्रमाणे या शहराची वाटचाल मी जवळून बघत आहे. काळाच्या गरजेनुसार माझ्या पुण्यात अनेक बरेवाईट बदल झाले असले, तरी मी या शहराच्या आकंठ प्रेमात आहे.वायएमसीएवर मी खेळाडू म्हणून घडलो. मला चांगलं आठवतं... तिथे मैदानावर खेळण्यासोबतच परिसरात पतंग उडवणं, सूरपारंब्या खेळणं, चिंचा, शिंदोडे दगडानं नेम धरून पाडणं... यासारखे उद्योग चालायचे. हे मैदान समतल नसल्यानं क्षेत्ररक्षण करताना जास्त मेहनत घ्यावी लागायची. या समस्येला संधीत रूपांतरित केल्यानं माझे रिफ्लेक्सेस परफेक्ट झाले. मला ‘पँथर’ ही उपाधी मिळण्यामागे हे कारण आहे. सरावानंतर शेजारील चर्चच्या दिशेनं तोंड करून ‘मला चांगला क्रिकेटपटू होऊ दे,’ अशी प्रार्थना करायचो. प्रयत्नांना प्रार्थनेची जोड लाभल्यानं कसोटीपटू, कर्णधार, संघव्यवस्थापक निवड समिती प्रमुख अशा विविध पातळ्यांवर स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली, अशी माझी भावना आहे.क्रिकेटचा विचार करता, ‘टेस्ट ईज बेस्ट’ आहे. आयपीएलनं क्रिकेटला अधिक लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंत केलं असलं, तरी कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट आहे. बेसिक्सचा कस तिथं लागतो. अर्थात, टष्ट्वेंटी-२० फॉरमॅटमुळे कसोटी क्रिकेट अधिक वेगवान झालंय, हेही मान्य करायला हवं.पुण्यनगरीत क्रीडा संस्कृती रुजवण्यात अनेक क्लबचं योगदान नि:संशय मोलाचं आहे. भारतीय आॅलिम्पिकची चळवळ इथूनच रुजली. आताही अनेक क्लब पुण्यात क्रीडा संस्कृतीच्या अधिकाधिक विकासात मोठं योगदान देत आहेत. सुविधा, मार्गदर्शन आणि शिस्त ही या क्लबची वैशिष्ट्यं सांगता येतील. विविध खेळांतील अनेक माजी खेळाडू या क्लबचे सदस्य आहेत. शिवाय, ते युवा खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक असतात. याचा विशेष फायदा नव्या दमाच्या खेळाडूंना होतो.आधीपासूनच पुणं हे खेळांसाठी पूरक शहर आहे. पूर्वी पुण्याचं वातावरण खेळ व खेळाडूंसाठी आदर्शवत होतं. नंतर पुणं गजबजलं. याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर झाला. असं असलं, तरी इतर शहरांपेक्षा पुणं आजही खेळांसाठी सरस आहे.आमच्या काळात सुविधा अपुऱ्या होत्या; मात्र मैदानं भरपूर होती. आता संपन्नता आल्यावर हे चित्र नेमकं उलट झालंय.आता सुविधा भरपूर नि मैदानं कमी झालीयत. २००८च्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं म्हाळुंगे-बालेवाडी परिसरात सोयीसुविधायुक्त शिवछत्रपती क्रीडासंकुल निर्माण करण्यात आलं; पण त्यानंतरच्या १० वर्षांत काय? या संकुलासारखी संकुलं शहराच्या सर्व दिशांना निर्माण व्हायला हवीत. तिथं अद्ययावत सुविधांसह योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास आपल्या शहराचं क्रीडावैभव भरभराटीला येईल.सध्या केंद्र सरकार ‘स्मार्ट सिटी’ हा उपक्रम राबवत आहे. पुण्याचा त्यात असलेला समावेश ही खचीतच आनंदाची गोष्ट आहे. पुणं स्मार्ट होताना ते क्रीडाक्षेत्रातही स्मार्ट व्हावं, यासाठी शासन-प्रशासन स्तरावर योग्य ते प्रयत्न व्हायला हवेत. इथल्या जास्तीत जास्त खेळाडूंनी आपल्या शहरासोबतच देशाचं नाव जगात उंचवावं, अशी पुणेकर आणि एक खेळाडू म्हणून अपेक्षा आहे. ( शब्दांकन : अमोल मचाले ) 

टॅग्स :Cricketक्रिकेटPuneपुणेnewsबातम्या