शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या :  कौशल इनामदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 20:35 IST

संगीत क्षेत्र प्रचंड व्यापक असून त्यावर आजचे युग हे स्पर्धात्मक आहे. यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मेहनत हाच एक सर्वोत्तम पर्याय आहे : कौशल इनामदार

पुणे :  चित्रपट, नाटक, जाहिरात, टेलीव्हिजन यासाठी आवश्यक संगीत हे एक विशेष काम झाले आहे. या गोष्टींचे शास्त्र व्यवस्थितपणे शिकवणे गरजेचे आहे. यासाठी उपयोजित संगीत याविषयीची कार्यशाळा विद्यापीठांमध्ये घ्यायला हवी. अभिजात, शास्त्रीय संगीत शिकणा-या विद्यार्थ्यांना देखील संगीताकडे बघण्याचा दृष्टीकोन अशा कार्यशाळांमधून मिळणार आहे. संगीतावर तंत्रज्ञानाचा परिणाम झाला आहे. आज कोणत्याही प्रकारचे संगीत एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध होते. तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या आहेत, असे मत संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केले. उपयोजित संगीत या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कोथरुड येथील भारती विद्यापीठ स्कूल आॅफ परफार्मिंग आर्टस्च्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी केंद्राचे संचालक शारंगधर साठे, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. संगीताची उत्पत्ती कशी झाली?, आदिम संगीत, लोकसंगीत, जनसंगीत, कला संगीत अशा विविध संगीताविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्रातील आदिम संगीतात कशाप्रकारे साम्य आहे. संगीत आणि संस्कृती यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे?, कवितेला चाल लावताना कोणत्या घटकांचा वापर केला पाहिजे. एखाद्या शब्दांना चाल कशी लावली पाहिजे किंवा चालींमध्ये शब्द कशाप्रकारे बसविले पाहिजेत. अशाप्रकारे कार्यशाळेतून संगीताविषयी माहिती देत संगीतकार कौशल इनामदार यांनी विद्यार्थ्यांसमोर उपयोजित संगीताचे विविध पैलू उलगडले.कौशल इनामदार म्हणाले, मदन मोहन यांनी गाण्यातील शब्द त्याचा अर्थ आणि त्यासाठी योजलेली चाल हे समीकरण अत्यंत सुंदर आहे. त्यामुळे हे गीत आजही लोकांच्या स्मरणात राहिले आहे. पूर्वीच्या गीतांच्या चालींमधील स्वरसमूह मोठे होते, त्यामध्ये एकप्रकारची सूत्रबद्धता होती. त्यामुळे ती गाणी चिरकाल स्मरणात राहिली आहेत.    

टॅग्स :Puneपुणेbharti universityभारती विद्यापीठmusicसंगीत