शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आत्ममग्नतेची संगीत मैफल ही आनंदयात्राच!

By admin | Updated: June 29, 2017 03:26 IST

व्हायोलिनवादनामध्ये आत्ममग्नतेचा आनंद, रसिकांचा आनंद आणि दिग्गज कलाकारांना ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्याचा आनंद

व्हायोलिनवादनामध्ये आत्ममग्नतेचा आनंद, रसिकांचा आनंद आणि दिग्गज कलाकारांना ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्याचा आनंद ही अनोखी आनंदयात्राच असते. शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकार आपल्यात नसले तरी त्यांनी आपल्या नाममुद्रेसह स्वरमंदिरे उभी केली आहेत. प्रत्येक मैफल हा नवीन जन्म, नवी साधना आणि नवा विचार असतो. मैफलींमध्ये रंगून जाताना आयुष्य त्रोटक आहे, असे वाटू लागते. नव्या पिढीने ही संगीतसाधना आत्मसात करून परिपूर्णतेच्या दिशेने प्रवास करावा, असे मत ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त व्यक्त केले.व्हायोलिनवादनाची प्रत्येक मैफल हा नवीन जन्म, नवी साधना आणि नवा विचार असतो. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये रंगून जाताना आयुष्य त्रोटक आहे, असे वाटू लागते. प्रत्येक मैफलीतून एकमेवाद्वितीय आनंद मिळत असतो. त्यामुळे त्यामध्ये डावे-उजवे असे ठरवता येत नाही. मैफलीचा आनंद हे कलावंत आणि रसिकांमधील अदृश्य तरीही मनस्वी आनंद देणारा झरा असतो. गाण्याचा आनंद घेणारा, जाणकार बुद्धिजीवी रसिकवर्ग समोर असेल, तर वादन अधिकच खुलते. मी देशाप्रमाणे परदेशातही व्हायोलिनवादनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. पुण्यामध्ये अनेक संगीत मैफली होतात; मात्र परदेशातील रसिकांना अशा मैफलींचा आनंद अभावानेच घेता येतो. त्यामुळे तेथील मैफली कायमच रंगतात.व्हायोलिनवादनाचे बाळकडू मला घरातूनच मिळाले. माझे वडील गुरुवर्य बाळकृष्ण उपाध्ये यांच्याकडून मी व्हायोलिनचे धडे गिरवले. वडिलांनी १९५१ साली व्हायोलिन अ‍ॅकेडमीची सुरुवात केली. मी गेल्या ४५ वर्षांपासून वादन करत आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली संधी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ, बासरीवादक पं. रोणू मुजूमदार, दया शंकर, उस्ताद दिलशाद खाँ या कलावंतांसमवेत रंगलेली जुगलबंदी कायम लक्षात राहणारी आहे. शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकार आपल्यात नसले तरी त्यांनी आपल्या नाममुद्रेसह स्वरमंदिरे उभी केली आहेत.शहरी भागात शास्त्रीय संगीताच्या मैफली सातत्याने होत असल्याने कानसेन तयार होतात. ग्रामीण भागातही संगीताचे जाणकार असतात. केवळ संगीत त्यांच्यापर्यंत पोचण्याची आवश्यकता असते. त्यामुळेच मी अनेक गायकांसह सोलापूर, कोल्हापूर, अमरावती अशा ठिकाणी जाऊन मैफली आयोजित करण्याचा प्रयत्न करत असतो. व्हायोलिनवादनामध्ये आत्ममग्नतेचा आनंद, रसिकांचा आनंद आणि दिग्गज कलाकारांना ‘याचि देहि, याचि डोळा’ अनुभवण्याचा आनंद ही अनोखी आनंदयात्राच असते. शास्त्रीय संगीताने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. परदेशामध्ये संगीत हा विषय शिक्षणात अंतर्भूत करण्यात आला आहे. आपल्याकडे अद्याप ती यंत्रणा विकसित झालेली नाही. मुलांमध्ये उपजतच संगीताची आवड असते. ही अभिरुची वृद्धिंगत करायची असेल तर मुलांवर लहानपणापासून संगीताचे संस्कार करायला हवेत. त्यासाठी शाळा-शाळांमध्ये जाऊन ‘म्युझिक अ‍ॅप्रिसिएशन कोर्स’च्या माध्यमातून संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.संगीत हे मन:शांतीसाठी प्रभावी माध्यम आहे. संगीतामुळे मनावरील ताण नाहीसा होतो आणि प्रसन्नता लाभते. शास्त्रीय संगीतामध्ये रियाझाला अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र, किती तास रियाझ केला जातो, यापेक्षा किती डोळसपणे आणि योग्य दिशेने रियाझ सुरू आहे का, याला महत्त्व असते. चुकीच्या दिशेने होणारा रियाझ निरुपयोगी ठरतो. गायन आणि वादनाच्या रियाझासाठी गुरूला योग्य विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला योग्य गुरू मिळाल्यास जडणघडणीचा प्रवास आनंददायी असतो. आजकाल तरुण मोठ्या संख्येने व्हायोलिनवादनाकडे वळू लागले आहेत, हे आशादायी चित्र आहे. व्हायोलिन हे मानवी स्वराच्या जवळ जाणारे वाद्य आहे. त्यामुळे व्हायोलिनवर ठुमरी, तराणा, जोडझाला, धून असे वैविध्यपूर्ण वादन करता येते.१०० व्हायोलिन एकत्र वाजवले तरी गोंगाट न होता सुरेल वातावरण निर्माण होते. व्हायोलिनच्या पूर्णत्वाकडे जायला पुढील ५० वर्षे लागतील, असेही ते म्हणाले.